राष्ट्रीयविशेष

शिरुरचे चार जण न्यायधीश

ॲड.अक्षय ताठे .ॲड . शुभम कराळे ,ॲड.सागर नळकांडे , ॲड . सुमेधा वाखारे यांची न्यायधीश म्हणून निवड . .

शिरुर दिनांक ( वार्ताहर )
शिरुर तालुक्यातील चार जणांची एकाच वेळी प्रथम वर्ग न्यायाधीश पदावर निवड झाली आहे . चौघा पैकी तीन जण एकमेकांचे मित्र असून वकीली व्यवसाय सोबत करण्या बरोबर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा एकत्रित अभ्यास करत ही परीक्षा उत्तीर्ण होवून तीघे ही मित्र न्यायाधीश बनले आहेत .ॲड . सुमेधा बाजीराव वाखारे

ॲड . शुभम कराळे , ॲड . सागर नळकांडे व ॲड .अक्षय ताठे यांचा बरोबरच ॲड .सुमेधा बाजीराव वाखारे या चार जणांची न्यायधीशपदी निवड झाली आहे .
शिरुर तालुक्याची यापूर्वी दुष्काळी तालुका अशी ओळख होती . परंतु काही वर्षापूर्वी शिरुर तालुक्यात सिंचनाचा सुविधा वाढत गेल्याने मोठ्या प्रमाणावर सिंचनाचा असणारा तालुका अशी ओळख निर्माण झाली . त्याच बरोबर मोठ्या संख्येने प्रशासकीय सनदी आधिकारी व प्रशासकीय आधिकारी असणारा तालुका अशी ओळख शिरुरची निर्माण झाली आहे . त्यातच एकाच वेळी शिरुर मधील चार जणांची न्यायधीशपदावर निवड झाल्याने शिरुरच्या यशाची चर्चा सर्वदूर होत आहे .
कारेगाव ,ता .शिरुर येथील अक्षय ताठे , बुरुंजवाडी येथील ॲड सागर नळकांडे व शिक्रापूरचा ॲड. शुभम कराळे एकमेकांचे मित्र आहे. एकाच तालुक्यातील असणाऱ्या या मित्रांचे पुण्यातील वेगवेगळ्या विधी महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण एल.एल.एम चे त्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथून पूर्ण केले.
पुणे जिल्हा सत्र न्यायालयात वकिली व्यवसायानिमित्त या मित्रांची पुन्हा भेट झाली . ॲड . शुभम कराळे यांनी फौजदारी वकिली तर ॲड . अक्षय ताठे व ॲड . सागर नळकांडे यांनी दिवाणी न्यायालयात वकिली सुरु केली .दरम्यान या तीनही मित्रानी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पदाची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला व या परीक्षेची एकत्रित तयारी व अभ्यास सुरु केला .
ज्येष्ठ विधीज्ञ गणेश शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली या तीघांनी परीक्षेची तयारी व अभ्यास केला .नूकत्याच या परीक्षेचा निकाल जाहीर झाला व तीघे ही मित्र या परीक्षेत उत्तीर्ण होवून न्यायधीश बनले .
ॲड .सुमेधा बाजीराव वाखारे यांचे शालेय शिक्षण शिरुर मधून झाले. त्यानंतर कायदाचे शिक्षण पुण्यातून पूर्ण केले . त्याचे वडिल ॲड . बाजीराव वाखारे हे प्रख्यात कायदेतज्ञ आहेत .
सुमेधा यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी पदाची परीक्षा दिली व त्यात त्या उत्तीर्ण होवून न्यायधीश बनल्या आहेत. .दरम्यान निवडी नंतर बोलताना ॲड. अक्षय ताठे यांनी सांगितले की आम्ही तीघे ही मित्र मराठी माध्यमातून शिकलो. . सन २०१९ ला मी लोकसेवा आयोगच्या न्यायधीश पदाची परीक्षा उत्तीर्ण झालो होतो . परंतु तांत्रिक कारणाने नियुक्ती होवू शकली नाही . परंतु मी प्रयत्न करणे सोडले नाही . तीसरा प्रयत्नात मी पुन्हा ही परीक्षा पास झालो . तुम्ही तुमच्यातील आत्मविश्वासावर विश्वास ठेवा व जिद्दीने व सातत्यपूर्ण अभ्यास करा. यश तुम्हाला नक्कीच मिळेल कोणत्याही परिस्थितीत नाउमेद न होता प्रयत्न करीत राहा .
ॲड .सुमेधा बाजीराव वाखारे निवडी नंतर बोलताना म्हणाल्या की पहिल्या पासून न्यायदानाच्या क्षेत्रात काम करायचे हे माझे निश्चित होते . पहिल्या प्रयत्नात अपयश आले. अपयशाने खचून न जाता जिद्दीने अभ्यास सुरु ठेवला. वडिल ॲड .बाजीराव वाखारे व आई सुनीता वाखारे यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. मी ठरवलेल्या ध्येयाची पुर्तता झाल्याने आनंद झाल्याचे त्या म्हणाल्या .
शिरुर तालुक्यातील चार जण एकाच वेळी न्यायाधीश झाले असून या सर्वांच्या शनिवार दिनांक ५ एप्रिल २०२५ रोजी सन्मान करण्यात येणार असल्याचे शिरुर वकील संघटनेचे अध्यक्ष नोटरी अमित खेडकर यांनी सांगितले .

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button