गुन्हेगारी

शिरुर मधुन ३ जण तडीपार

पोलीसांची कारवाई

शिरुर ( डेली न्यूज पोस्ट टीम -24) शिरूर व करडे-सरदवाडी एम.आय.डी. सी येथे दहशत करणारे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार संकेत महामुनी टोळी मधील टोळी सदस्य अभिषेक मिसाळ, शुभम दळवी, गणेश उर्फ श्रीरंग महाजन यांना २ वर्षासाठी तडीपार करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिली आहे .
त्यांनी सांगितले की शिरूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सन २०१६ ते सन २०२४ या कालावधीमध्ये टोळीप्रमुख संकेत संतोष महामुनी रा. सरदवाडी ता. शिरूर जि. पुणे याने त्याची एक स्वंतत्र टोळी दरवेळी नेहमीचे टोळीसदस्य अभिषेक हनु‌मान मिसाळ वय २३वर्षे रा. सोनारआळी शिरूर ता. शिरूर जि.पुणे , शुभम दत्तात्रय दळवी रा. प्रितमप्रकाशनगर शिरूर ता. शिरूर जि. पुणे ,गणेश उर्फ श्रीरंग शंकर महाजन वय ३० वर्षे रा. गोलेगाव ता. शिरूर जि. पुणे यांचेसह व काही नव्याने साथीदार घेवुन निर्माण केली होती.
या टोळीने एकत्रीतरित्या शिरूर पोलीस ठाणे हददीत मध्ये, रांजणगाव एम.आय. डी.सी मध्ये व शिरूर तालुक्यामध्ये गावठी पिस्तुलाचा वापर करून खून करण्याचा प्रयत्न करणे, शिवीगाळ करणे, धमकी देणे, दुखापत करणे, बेकायदेशीर जमाव जमवुन गुन्हा करणे, बेकायदा घातक हत्यारे गावठी पिस्तुले राजरोस जवळ बाळगणे , गुन्हे करणेसाठी चिथावणे अशा प्रकारचे गुन्हे वेळोवेळी केलेले आहेत.
या टोळीविरूध्द पोलीस अधीक्षक पकंज देशमुख यांनी परिणामकारक प्रतिबंधक कारवाई करण्याबाबत पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना सुचना दिली होती. त्या नुसार पोलीस निरीक्षक शिरूर यांनी प्रस्ताव पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांना सादर केला होता.
त्यावर सुनावणी होवुन पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी गंभीर दखल घेत सदर आरोपींना २ वर्षाकरीता पुणे जिल्हा (पिंपरी चिंचवड शहर व पुणे शहर हद्दी सह) अहिल्या नगर जिल्हयातील पारनेर व श्रीगोंदा तालुक्यांतुन दि. २/४/२०२५ पासुन तडीपार केले आहे. यापुढील कालावधीतही शिरूर पोलीस ठाणे हद्दीत व शिरूर तालुक्यामधील औद्योगिक क्षेत्रांमध्ये दहशत व गुंडगिरी करणा-यांवर अशाच प्रकारे कठोर कार्यवाही करणार असल्याचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी सांगितले .
वरील आरोपींवर ठोस प्रतिबंधक कार्यवाही करून तडीपार व हद्दपार करणे कामी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण चे अविनाश शिळीमकर , पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण , पोलीस हवालदार परशराम सांगळे, पोलीस अमंलदार सचिन भोई तसेच स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणचे पोलीस हवालदार महेश बनकर, रामदास बाबर , शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप, पोलीस अमंलदार नितेश थोरात, निरज पिसाळ, विजय शिंदे, रविंद्र आव्हाड, अजय पाटील, निखील रावडे यांनी कामकाज पाहिले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button