शिरुर मधून २४ वर्षीय युवक बेपत्ता
शिरूर दिनांक ( डेली न्यूज पोस्ट टीम -24)
टाकळी हाजी , ता . शिरुर येथील
प्रवीण कैलास गावडे वय २४ वर्षे, व्यवसाय-निदान पॅथालाजी लॅब निर्माण प्लाझा शिरुर , हे कोण्यास काही न सांगता निघून गेले असून या संदर्भात मिसिंगची खबर शिरुर पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे .
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार किरण कैलास गावडे वय रा. टाकळी हाजी ता. शिरूर जि. पुणे यांनी मिसिंगची खबर पोलीस ठाण्यात दिली आहे .
दिनांक १ एप्रिल २०२५ रोजी
निदान पॅथालाजी लॅब निर्माण प्लाझा शिरुर येथून सकाळी सव्वा नउच्या सुमारास प्रवीण कैलास गावडे, वय २४ हे बजाज कंपनीची इलेक्टीकल स्कुटर घेवून कोणास ही काही एक न सांगता कोठे तरी निघून गेले आहेत . त्याचा शिरूर परीसर व नातेवाइक यांचेकडे शोध घेतला असता त्याचा शोध लागला नाही .
या संदर्भात मिसिंगची खबर पोलीस ठाण्यास देण्यात आली आहे.
मिसिंग झालेले प्रवीण गावडे यांची उंची 166 सेंमी, अंगाने मजबुत, रंग सावळा, शिक्षण डी. एम. एल.टी. केस काळे आहेत . भाषा मराठी बोलतात, अंगात पांढरे रंगाचा शर्ट, काळे रंगाची पॅन्ट असे कपडे आहेत.व बजाज कंपनीची इलेक्टीकल स्कुटर एम. एच. 12 डब्लु. सी 1704 असा नंबर असलेली स्कुटर आहे .याबाबतचा तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार खेडकर करीत आहेत .