रेकॉर्डवरील गुन्हेगारा कडून चार गावठी पिस्तुल, बारा काडतूस, तीन मॅग्झीन असा एकूण १ लाख ८२हजार रू. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यासह जेरबंद करण्याची स्थानिक गुन्हे शाखेचा पोलीसांची कामगिरी
शिरुर ( डेली न्यूज पोस्ट -24 )
रांजणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील सोनेसांगवी , ता . शिरुर येथील
सुरज राजेश पाडळे या रेकॉर्डवरील गुन्हेगारा कडून चार गावठी पिस्तुल, बारा काडतूस, तीन मॅग्झीन असा एकूण १ लाख ८२हजार रू. किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यासह जेरबंद करण्याची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचा पोलीसांनी केली आहे .
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार २६ मार्च २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रांजणगाव एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदयावर कारवाई करण्याचे अनुषंगाने गस्त करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाला माहिती मिळाली की, रेकॉर्ड वरील आरोपी सुरज राजेश पाडळे रा. सोनेसांगवी, ता. शिरूर, जि पुणे याचेकडे अवैध गावठी पिस्तुल असून तो सध्या त्याचे राहते घरी सोनेसांगवी येथे आहे,
अशी बातमी मिळालेने पोलीस पथकाने दोन पंचांसह सोनेसांगवी येथे जावून त्याचे राहते घरी छापा कारवाई करत सुरज राजेश पाडळे यास विश्वासात घेवून चौकशी केली असता, सुरज पाडळे व त्याचा संकेत संतोष महामुनी रा. सरदवाडी, ता. शिरूर जि.पुणे, व इतर दोन मित्र यांनी मध्यप्रदेश येथे जावून प्रत्येकी एक प्रमाणे चार गावठी पिस्तुल विकत घेतले असून त्यासोबत जिवंत काडतूस व अधिकचे मॅग्झीन आणले असल्याचे सांगितले.
त्यानंत सुरज पाडळे याने त्याचे कंबरेला खोवलेले गावठी पिस्तुल व इतर तिघांनी त्याचे कडे ठेवण्यासाठी दिलेले गावठी पिस्तुले व काडतुस, मॅग्झीन काढून दिली. गुन सुरज राजेश पाडळे याचे कडून एकूण ०४ गावठी पिस्तुल, १२ जिवंत काडतूस, ०३ मॅग्झीन असा एकूण १,८२,०००/- रू. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपी सुरज राजेश पाडळे याचेसह इतर तिघांवर शिरुर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि नोंद ९७/२०२५ भा.ह.का. ३,२५ प्रमाणे गुन्हा नोंदविणेत आलेला आहे. त्यांनी सदरचे अवैध गावठी पिस्तुल खरेदी करण्यामागे व बाळगण्यामागे त्याचा नेमका कोणता हेतू आहे याकरीता पुढील तपास चालू असून पाडळे यास न्यायालयात हजर करेणत आले असता न्यायालयाने २ एप्रिल २०२५ पर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे .
आरोपी सुरज पाडळे व संकेत महामुनी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांचेवर यापुर्वी शरोराविरूद्धचे व आर्म ॲक्ट अंतर्गत गुन्हे दाखल आहेत,
स्थानिक गुन्हे शाखेकडून चालु वर्षात अवैध अग्निशस्त्र बाळगणारे आरोपीवर कारवाई करत एकूण ०७ अवैध अग्निशस्त्र १७ जिवंत काडतूस हस्तगत करणेत आलेले आहेत.
विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र, यांचेकडून पुणे ग्रामीण जिल्हयाची वार्षिक तपासणी चालू आहे . दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेकडून कारवाई करून मोठ्या प्रमाणात अवैध अग्निशस्त्र साठा हस्तगत करणेत आल्याने पोलीस अधीक्षक पकंज देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे कौतुक करून सर्वांचे अभिनंदन केले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ताजीराव मोहिते, पोलीस अंमलदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजय जाधव, राजू मोमीन, अमोल शेडगे यांनी केली.