शिरूर तालुक्यात खरीप हंगामात ९४,९८८ हेक्टरवर पेरणी पूर्ण
शिरूर (डेली न्यूज पोस्ट -24)ता लुक्यात खरीप हंगामाकरिता ९४,९८८ हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली असून जून महिन्यात सरासरीचा 161% १५४ मिलीमीटर तर जुलै महिन्यात ४८ % ( ४४ मिमी )व ५ ऑगस्ट,2025च्या अखेरीस १% (०.७ मिमी ) पाऊस झाल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी सुवर्णा आदक, (कटके ) यांनी दिली आहे.
तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार खरीप हंगामासाठी यंदा शिरूर तालुक्यात एकूण ९४,९८८.४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे. यामध्ये तृणधान्याची 13,226 हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे.
त्यात बाजरीचे पेरणी क्षेत्र 11,647, मका 1,579 हेक्टर, भात 0.4 हेक्टर वर पेरणी करण्यात आली आहे.
कडधान्याची 8,791 हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली असून यात तूर 161 हेक्टर, मूग 7,699 हेक्टर, उडीद 155 हेक्टर, मटकी 84 हेक्टर, वाटाणा 251 हेक्टर, हूलगा 65 हेक्टर, चवळी 99 हेक्टर, वाल 189 हेक्टर, घेवडा 85 हेक्टर वर पेरणी करण्यात आली आहे.
गळीत धान्य(तेलबिया) यांची सुमारे 4,535 हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे. तालुक्यात गळीत धान्य क्षेत्राचे सरासरी क्षेत्र 1528 हेक्टर असताना 4535 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे हे प्रमाण सरासरी च्या 296 % एवढे आहे. भुईमूग 30 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची 4999 हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे.
तालुक्यात कापसाची 492 हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे.
कांदा 319 हेक्टरवर,बटाटा 48 हेक्टर वर तर टोमॅटो चे सरासरी पेरणीचे क्षेत्र 277 हेक्टर असताना प्रत्यक्षात 135 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. ते सरासरीच्या 48% इतके आहे. याशिवाय भाजीपाला ६,५०३ हेक्टर,
मसाला पिके 9 हेक्टर, फळपिके २,२१६ हेक्टर, कडवळ 1,761 हेक्टर, ल्यूसर्न घास १,४९४ हेक्टर, चारा पीकाची १,०६५ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे.तर ५१,८६० हेक्टर क्षेत्र उसाचे असल्याची माहिती ही देण्यात आली .
