अपघात

टेंम्पो व स्कूटीचा अपघातात महिला मृत्युमुखी तर दोन मुले जखमी


शिरुर दिनांक ( वार्ताहर ) पुणे अहिल्यानगर महामार्गावर कारेगाव येथे फलके मळा येथे झालेल्या टेंपो व स्कूटीचा अपघातात सौ .आरती गणेश सावंत वय -३३ ( रा . राहणार गंगा फेज 3 जुडिओ मॉलचे पाठीमागे शिरूर तालुका शिरूर जिल्हा पुणे) या मरण पावल्या . तर त्यांची मुलगी स्वराली
व मुलगा स्वराज्य जखमी झाला .
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार यासंद्सर्भात सिद्धार्थ इंद्रभान गिरमकर वय २८ वर्षे धंदा नोकरी राहणार उरळगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे यांनी टेम्पो नंबर एम एच -१५ जी.व्ही.७१८२ वरील अज्ञात चालक विरोधात फिर्याद दिली आहे .
अपघातात सौ. आरती गणेश सावंत वय ३३ वर्ष रा . रांजणगाव , ता शिरुर जि. पुणे या मरण पावल्या .
तर 1)स्वराली गणेश सावंत वय 12 वर्ष व 2) स्वराज गणेश सावंत वय 15 वर्षे हे जखमी झाले .
हा अपघात ४ जून रोजी कारेगाव, फलके मळा येथील चौकामधील डिव्हायडर जवळ झाला .अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो नंबर एम . एच -१५ जी . व्ही .७१८२ यावरील चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन हयगईने, अविचाराने, रहदारीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून,भरधाव वेगात चालून ॲक्टिवा स्कूटी नंबर एम एच .१२ पीआए ६४५१ ला पाठीमागून जोरात धडक दिली . अपघातामध्ये सौ.आरती गणेश सावंत वय 33 वर्ष राहणार गंगा फेज 3 जुडिओ मॉलचे पाठीमागे शिरूर तालुका शिरूर जिल्हा पुणे या मरण पावल्या . तर त्यांची मुलगी स्वराली गणेश सावंत वय 12 वर्ष व मुलगा स्वराज गणेश सावंत वय 15 वर्ष मुलगा जखमी झाले . अपघाताची खबर न देता वाहन चालक पळून गेला. यासंदर्भात आधिक तपास पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस इन्स्पेक्टर चव्हाण करीत आहेत .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button