Uncategorizedविशेष
शिवजयंती निमित्त
शिरुर शहर व पंचक्रोशी शिवजयंती उत्सव समितीचा वतीने शिवनाट्य , शाहिरी कार्यक्रम ,व्याख्यान , व मिरवणुकीचे आयोजन

यासंदर्भात माहिती देताना शिरुर शहर व पंचक्रोशी शिवजयंती उत्सव समितीचे कुणाल काळे यांनी सांगितले शिरुर शहर व पंचक्रोशी शिवजयंतीनिमित्त दरवर्षी व्याख्यान व शिवनाट्यचे सादरीकरण केले जाते.
निर्माण प्लाझा जवळील गुजरमळा मैदानावर सायंकाळी ही व्याख्याने व शिवनाट्य होणार आहे .
रविवार दिनांक १६ फेबृवारीस प्रसिध्द व्याख्याते विठ्ठल कांगणे यांचे ‘ आजचा युवा उद्याचे भविष्य ‘ या विषयावर व्याख्यान देणार आहेत
सोमवार दिनांक १७ फेबृवारीस २५ कलाकार ‘ वाघनखं हे ऐतिहासिक नाट्य सादर करणार आहेत. मंगळवार दि , १८ फेबृवारीस सह्याद्री प्रतिष्ठान चे संस्थापक श्रमिक चंद्रशेखर गोजंमगुंडे यांचे ‘ गड किल्ले संवर्धन’ यावर मार्गदशन होणार असून यावेळी युवाशाहीर चंद्रकांत माने व ऋतुजा माने शाहिरी कार्यक्रम सादर करणार आहेत .

बुधवार दि – १९ फेबृवारीस शिवजयंतीनिमित्त बाजार समिती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या पासून शिवप्रतिमेची सायंकाळी ५ वाजता भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.
मिरवणूकीत ढोलपथक सह आकर्षक अतिषबाजी असणार आहे .
मोठ्या संख्येने वरील कार्यक्रमास व शिवजयंती मिरवणूकीस उपस्थित राहण्याचे आवाहन उत्सव समितीचा वतीने करण्यात आले आहे .



