Uncategorizedविशेष

आर. एम. धारिवाल इंग्लिश मीडियम स्कूलचा दहावीच्या परीक्षेचा शंभर टक्के निकाल

नहार पलक निलेश व महाजन स्वरांजली अतुल यांनी प्रत्येकी ९५ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला

नहार पलक निलेश या विद्यार्थिनीचा सत्कार करताना छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष रवींद्र धनक, डॉ. दिपक गायकवाड, मोहम्मद हुसेन व निलेश नहार, पलक ही दिवंगत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते धनजीभाई उर्फ धनराज नहार यांची नात आहे

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24,}: शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे आर. एम. धारिवाल इंग्लिश मीडियम स्कूलचा दहावीच्या एसएससी बोर्ड परीक्षा २०२५-२६चा शंभर टक्के निकाल लागला आहे. विद्यालयातील सर्व १०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे.

यामध्ये नहार पलक निलेश व महाजन स्वरांजली अतुल यांनी प्रत्येकी ९५ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. शिंदे रोहित बालू याने ९४.८० टक्के गुणांसह द्वितीय, तर बोरा जीत प्रदीप याने ९३.२० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळविला. तसेच आढाव श्रावणी मच्छिंद्र हिने ९३ टक्के गुण मिळवले आहे.

विद्यालयातील ९ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक, ३२ विद्यार्थ्यांनी ८० टक्क्यांपेक्षा अधिक, तर १९ विद्यार्थ्यांनी ७० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवत उज्वल यश मिळविले.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष धरमचंद फुलफगर, सचिव नंदकुमार निकम, महाविद्यालयीन नियामक मंडळाचे अध्यक्ष व प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश धरिवाल,मुख्याध्यापिका अश्विनी दीपक घारू यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून पालकांनीही समाधान व्यक्त केले आहे.

पलक निलेश नहार
पलक निलेश नहार

प्रथम क्रमांक आलेल्या पलक निलेश नहार ही विद्यार्थिनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कैलासवासी धनजीभाई नहार यांची नात आहे.पलक हिचा यशाबद्दल छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती शिरूरचे अध्यक्ष रवींद्र धनक, डॉ. दीपक गायकवाड व मोहम्मद हुसेन पाटील यांनी घरी जाऊन सत्कार केला. सरहद्द संस्थेचे संजय नहार यांनी ही पलक हिचे अभिनंदन केले आहे..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button