Uncategorizedधार्मिंकविशेष
शनी अमावस्या जयंतीनिमित्त श्री शनैश्वर देवस्थानात भाविकांची मोठी गर्दी
रविवार दिनांक 17 मे रोजी शनी मंदिर लाटेआळी येथे महाप्रसादाचे आयोजन. उपस्थित राहण्याचे भाविकांना आवाहन
शिरूर{ डेली न्यूज पोस्ट टीम 24}: शहरातील पुरातन व जागृत समजल्या जाणाऱ्या श्री शनैश्वर देवस्थान येथे शनी जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून शनिवारी दिवसभर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
यंदा अनेक वर्षांनंतर शनी जयंती आणि शनि अमावस्या एकत्र आल्याने दर्शनासाठी भाविकांचा उत्साह विशेष वाढल्याचे चित्र होते.
पहाटे पाच वाजता श्री शनैश्वर मंदिरातील मूर्तीला विधिवत अभिषेक करण्यात आला. त्यानंतर
महाआरती पार पडून मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. मंदिर परिसर आकर्षक फुलांची सजावट व रोषणाईने उजळून निघाला होता.
महाआरती पार पडून मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. मंदिर परिसर आकर्षक फुलांची सजावट व रोषणाईने उजळून निघाला होता.वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर समितीच्या वतीने मंडप तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
सकाळपासूनच दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना खिचडी व फराळाचे वाटप करण्यात आले. दिवसभरात हजारो भाविकांनी श्री शनैश्वरांचे दर्शन घेत धार्मिक कार्यक्रमात सहभाग नोंदविला. पंकज बिहाणी, संदीप बिहाणी,शिरूर नगरपरिषद बांधकाम समितीचे सभापती सुनील जाधव, नगरसेवक सागर नरवडे,
निलेश पवार, भूमिपुत्र प्रतिष्ठानचे सुशांत कुटे, अविनाश जाधव, आदीनी दर्शन घेतले. यावेळी अशोक काका भोसले,सचिन गरुडे सुनील जठार,राजेंद्र घोडके, शंतनू कोळपे,आर्यन गायकवाड तेजस टाक,ओम जाधव अदनान सय्यद आदी उपस्थित होते.
सकाळपासूनच दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना खिचडी व फराळाचे वाटप करण्यात आले. दिवसभरात हजारो भाविकांनी श्री शनैश्वरांचे दर्शन घेत धार्मिक कार्यक्रमात सहभाग नोंदविला. पंकज बिहाणी, संदीप बिहाणी,शिरूर नगरपरिषद बांधकाम समितीचे सभापती सुनील जाधव, नगरसेवक सागर नरवडे,
निलेश पवार, भूमिपुत्र प्रतिष्ठानचे सुशांत कुटे, अविनाश जाधव, आदीनी दर्शन घेतले. यावेळी अशोक काका भोसले,सचिन गरुडे सुनील जठार,राजेंद्र घोडके, शंतनू कोळपे,आर्यन गायकवाड तेजस टाक,ओम जाधव अदनान सय्यद आदी उपस्थित होते.दरम्यान, रविवारी (दि. १७ मे) महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता होणार आहे. सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले
असून भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर समितीचे व्यवस्थापक रवींद्र गोसावी यांनी केले.असून भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर समितीचे व्यवस्थापक रवींद्र गोसावी यांनी केले.




