अपघातराष्ट्रीय

मोटार सायकल व मालवाहतूक गाडीचा धडकेत १९ वर्षाच्या युवक मृत्युमुखी

शिरुर दिनांक ( वार्ताहर )
मलठण ते कवठेयेमाई या अष्टविनायक महामार्गावर शिंदेवाडी येथे छोट्या हत्ती चारचाकी मालवाहतूक गाडी व मोटार सायकल अपघातात गणेश रामदास शितकल, वय १९वर्षे, रा. कवठे येमाई, ता. शिरूर, जि. पुणे. हा मृत्युमुखी पडला .
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार कैलास बबन कुळके वय ३५ वर्षे व्यवसाय – शेती रा. कवठे येमाई ता. शिरूर जि. पुणे यांनी फिर्याद दिली आहे हा अपघात २२ एप्रिलच्या रात्री झाला . याबाबत महिंद्रा कंपनीच्या सुप्रो छोटा हत्ती चारचाकी मालवाहतूक गाडी नं. एम एच१६-सी. डी.६८५२ वरील चालकाचे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
२२ एप्रिल रोजी रात्री शिंदेवाडी, मलठण येथील मलठण ते कवठे येमाई अष्टविनायक रोडवरील एस. सी. टी. कृषी सेवा केंद्राचे जवळ गणेश रामदास शितकल हे कवठे येमाई बाजूकडून मलठण बाजुकडे बजाज पल्सर मोटार सायकल नंबर एम एच १२ -एल .झेड.६८०६ वरून जात असताना त्यास समोरून येणारे महिंद्रा कंपनीचे सुप्रो छोटा हत्ती चारचाकी मालवाहतूक गाडी नं. एम. एच. 16- सी .डी.- ६८५२ वरील अनोळखी चालकाने वाहन रस्त्याचे नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात गाडी चालवून रॉग साईडला येवून गणेश शितकल याचे मोटार सायकलला जोरात धडक दिली. धडकेत गणेश गंभीर दुखापत होवून मरण पावला . अपघाताची खबर न देता व जखमीस कोणत्याही प्रकारची मदत न करता अपघाताग्रस्त टेंपो चालक घटनास्थळ सोडून पळून गेला पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बनकर करत आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button