Uncategorizedअपघात

भरधाव आयशर टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; एक जखमी

शिरूर {डेली न्यूज पोस्ट टीम -24}: पुणे अहिल्यानगर महामार्गावर कारेगाव हद्दीत यश इन चौक येथे झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून एक जण किरकोळ जखमी झाला आहे. ही घटना १ एप्रिल रोजी दुपारी सुमारे ४.१० वाजण्याच्या सुमारास घडली.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फैजान अंजन खान (वय २६, रा. स्टेट बँक कॉलनी, शिरूर) हा दुचाकीवरून (एमएच १६ डीटी ७८९९) जात असताना पाठीमागून आलेल्या वाहनाने त्याच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे दुचाकी पुढे जाऊन रस्त्याच्या दुसऱ्या बाजूस फेकली गेली. यावेळी फैजान खान हा समोरून नगरकडून पुण्याकडे जाणाऱ्या आयशर टेम्पोच्या (क्रमांक जेएच १० सीपी ९६६८) मागील चाकाखाली आला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातात सोहेल जब्बार शेख (वय २२, रा. ओम रुद्र सोसायटी, रामलिंग रोड, शिरूर) हा किरकोळ जखमी झाला आहे. संबंधित आयशर टेम्पो चालक मोहम्मद नसीम अन्सारी (रा. झारखंड) याने वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालविल्याने हा अपघात घडल्याची फिर्याद देण्यात आली असून मोहम्मद अन्सारी यास अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार रासकर यांनी फिर्याद नोंदवली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस उपनिरीक्षक पासलकर करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button