धार्मिंक
राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की च्या जयघोषात हनुमान जयंती साजरी.

शिरुर { डेली न्यूज पोस्ट टीम -24}भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाच्या जल्लोषात शिरूर शहर व परिसरात हनुमान जयंती मोठ्या भक्तिभावाने साजरी करण्यात आली. “राम लक्ष्मण जानकी, जय बोलो हनुमान की” च्या जयघोषाने संपूर्ण शहर दुमदुमून गेले होते. विविध मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांसह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आल्याने वातावरण भक्तिमय झाले होते.
यावेळी ” राम लक्ष्मण जानकी, जय बोलो हनुमान की ” च्या जयघोष करण्यात आला . शहरातील मारुती आळी मंदिरात हनुमान जन्माचा पारंपारिक सोहळा झाला. हनुमान जयंती निमित्त सकाळी मारुती मंदिरातून दिंडी निघाली.ही दिंडी राम आळीतील कुटे वाडा येथील मारुती मंदिर व समस्त नामदेव शिंपी समाज राम मंदिर ,नाईकवाडा येथील मारुती मंदिर या ठिकाणी गेली. 
समस्त नामदेव शिंपी श्रीराम मंदिर येथे ही हनुमान जन्म सोहळा पार पडला. विवेक बगाडे व माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर यावेळी उपस्थित होते.
रामआळी तील कुटे वाडा येथील हनुमंतरायाची मूर्ती प्रत्यक्ष सद्गगुरु शंकर महाराज यांनी स्थापित केलेली असल्याचे सांगितले जाते.हनुमान जयंती निमित्त कुटे वाडात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
नाईक वाडा येथे नाईक वाडा येथील हनुमान मंदिरात ही आरती व हनुमान जन्म सोहळा झाला. यावेळी माजी मुख्याध्यापक बाळासाहेब गायकवाड दिलिप गायकवाड अशोक गायकवाड, राजेंद्र गायकवाड आदी उपस्थित होते.
यावेळी भाविकाना प्रसादाचे वाटप करण्यात आले . दिंडीची सांगता मारुती मंदिरात झाली. यावेळी अभिषेक व पूजा श्रीकांत जाधव यांच्या हस्ते झाली.पौरहित्य वैभवमहाराज जोशी यांनी केले.यावेळी उद्योजक अशोक कदम, परेश चव्हाण,बाळासाहेब गायकवाड योगेश महाजन, गणेश गायकवाड, विजय जाधव, प्रणव घाडगे, दत्तात्रेय पोटावळे, नारायण सिन्नरकर, बिपीन धुमाळ, विलास कर्नावट, प्रशांत टकले आदी उपस्थित होते. मंडळाच्या वतीने सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
तिळवण तेली समाज मारुती मंदिर मुंबई बाजार येथील हनुमान मंदिर येथे ही दिंडी , भजन , जन्मोत्सव व महाप्रसादाचा कार्यक्रम झाला .




