धार्मिंक
शिरूरमध्ये संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी सोहळा आज
महाअभिषेक, हरिभजन, हरिपाठ, महाआरतीनंतर महाप्रसाद; भाऊड सम्राट ह.भ.प. सावता केशव फुले यांचा भारूडाचा कार्यक्रम

सोहळ्याची सुरुवात सकाळी ६ वाजता महाअभिषेकाने होणार असून, सकाळी ८ वाजता ध्यान मंदिरात महाआरती होईल. दुपारी २ ते ५ या वेळेत हरिभजनाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ५ ते ६ या वेळेत हरिपाठ, तर सायंकाळी ६.३० वाजता नगरपालिकेच्या मंगळ कार्यालयात महाआरती होणार आहे.



या धार्मिक सोहळ्याचा व महाप्रसादाचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री संत शिरोमणी सावता महाराज समाज सेवा प्रतिष्ठान, शिरूर (घोडनदी), जि. पुणे यांच्या वतीने करण्यात आले आहे.





