Uncategorizedक्राईम

जास्त व्याजदर देणा-या एफ . डी व पॉलीसी सुरु करुन देतो असे सांगून २१ लाख ५४ हजार रु ची आर्थिक फसवणूक

एकावर गुन्हा दाखल

शिरूर दिनांक ( वार्ताहर ) बँकेच्या व्याजदरापेक्षा जास्त व्याजदर देणा-या एफ.डी. व नवीन पॉलीसी सुरू करून देतो असे खोटेनाटे सांगून नवीन पॉलीसी चालू न करता खोटया पावत्या देउन नवीन पॉलीसी व एफ. डी. चालू केल्याचे भासवून २१लाख व ४५ हजार रुपयेची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीमती कल्पना अंकुश ढोरमले वय ५० रा. रामलिंग रोड, ओम रूद्रा कॉलनी , शिरूर, जि. पुणे. यांनी विकास गुलाब बेलदार रा. लक्ष्मीनारायण नगर, च-होली , पुणे
यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे .
सन २०२२ पासून ते डिसेंबर २०२४ या कालावधीमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया शिरूर शाखा, ता. शिरूर, जि. पुणे या ठिकाणी एसबीआय लाईफ इन्सुरंश काम पाहणारे विकास गुलाब बेलदार रा. लक्ष्मीनारायण नगर, चरोली, पुणे याने बँकेच्या व्याजदरापेक्षा जास्त व्याजदर देणा-या एफ.डी. व नवीन पॉलीसी सुरू करून देतो असे खोटेनाटे सांगून कल्पना ढोरमले यांच्याकडून एकूण सहा ब्लॅक चेक सहीसह घेतले. त्यांनी कोणतीही एफ. डी. अथवा नवीन पॉलीसी चालू न करता ढोरमले यांना खोटया पावत्या देउन नवीन पॉलीसी व एफ. डी. चालू केल्याचे भासवले. आणि वेळोवेळी ढोरमले यांच्या परस्पर चेक वटवून एकू २१ लाख ४५ हजार रू. एवढी रक्कम ढोरमले यांच्या बँक खाते क्र. 35554265989 यावरून स्वतःच्या बँक खाते क्र. 33881261294 यावर जमा करून आर्थिक फसवणूक केली. यासंदर्भात पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सबइन्सपेक्टर माधुरी झेंडगे करीत आहेत .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button