धार्मिंक

शिरुर परिसरात हनुमान जयंती उत्सहात

' राम लक्ष्मण जानकी , जय बोलो हनुमान की चा जयघोष

 

शिरुर दिनांक (वार्ताहर )
शिरुर शहर आणि परिसरात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .हनुमान जयंतीनिमित्त अनेक मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते .
यावेळी ” राम लक्ष्मण जानकी, जय बोलो हनुमान की ” च्या जयघोष करण्यात आला . शहरातील मारुती आळी मंदिरात हनुमानजन्माचा सोहळा झाला. हनुमान जयंतीनिमित्त सकाळी मारुती मंदिरातून दिंडी निघाली ही दिंडी राम आळीतील कुंटे यांचे मारुती मंदिर व समस्त नामदेव शिंपी समाज राम मंदिर ,नाईकवाडा येथील मारुती मंदिर या ठिकाणी गेली. यावेळी भाविकाना प्रसादाचे वाटप करण्यात आले . दिंडीची सांगता मारुती मंदिरात झाली. ,तिळवण तेली समाज मारुती मंदिर मुंबई बाजार येथील हनुमान मंदिर येथे ही दिंडी , भजन , जन्मोत्सव व महाप्रसादाचा कार्यक्रम झाला . गोरक्षण पांजरापोळ येथील मारुती मंदिर , बजरंगबली मंदिर जोशीवाडी ,सोनार आळी तील पूर्वमुखी हनुमान मंदिर ,
याठिकाणी ही हनुमान जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रम व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
रामलिंग व तर्डोबाचीवाडी येथे ही हनुमान जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button