राष्ट्रीय

भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना घडविण्यात वडिल रामजी आंबेडकर यांचे मोठे योगदान

प्रसिध्द शिवव्याख्याते नितीन बानुगडे यांचे प्रतिपादन

शिवव्याख्याते नितीन बानुगडे शिरुर येथे व्याख्यानात बोलताना

शिरुर दिनांक ( टीम डेली न्यूज पोस्ट -24)
भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना घडविण्यात त्याचे वडिल रामजी आंबेडकर यांचे मोठे योगदान असल्याचेप्रसिध्द व्याख्याते नितीन बानुगडे म्हणाले .       राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले व विश्वरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर सयुंक्त जयंती उत्सव समिती शिरुर व यांच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेत बानुगडे बोलत होते .
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरुर वकिल संघटनेचे माजी अध्यक्ष संजय ढमढेरे होते . राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले व विश्वरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर सयुंक्त जयंती उत्सव समिती शिरुरचे अध्यक्ष विनोद भालेराव , राष्ट्रवादी कॉग्रेस ( शरदचंद्र पवार ) चे शहराध्यक्ष मुजफ्फर कुरेशी , शिरुर वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड .अमित खेडकर , उत्सव समितीचे माजी अध्यक्ष रमेश गायकवाड , माजी नगरसेविका ॲड . माया गायकवाड , सचिव प्रमोद गायकवाड , पत्रकार संघाचे संस्थापक नितीन बारवकर ,व्यवसायिक नितीन मुथा , माजी नगरसेवक मुन्ना शेख , दीपक शेजवळ ,हाफीज बागवान , प्रा . रतनकुमार ससाणे , मुख्याध्यापक संजय वाघ , शिक्षक शिंदे  , शिक्षक नगरे ,  रामा झेंडे आदी  उपस्थित होते .
बानुगडे म्हणाले की डॉ.आंबेडकर हे ६४ विषयात तज्ञ होते . ९ भाषा त्यांना अवगत होत्या . ३२ शैक्षणिक पदव्या त्याच्याकडे होत्या . हिंदूस्थानचा इतिहासात सर्वात जास्त पदव्या त्यांनी घेतल्या .डॉ .आंबेडकर यांनी सातत्याने समाजासाठी संघर्ष केला . परिस्थिती अनूकूल नसतानाही मोठे शैक्षणिक विश्व त्यांनी निर्माण केले .
डॉ .आंबेडकरांनी सातत्याने ग्रंथ व पुस्तकांचे वाचन केले .त्यांच्या वैयक्तिक ग्रंथालयात ५० हजार पुस्तके होती तर अडीच लाख ग्रंथाचे त्यांनी वाचन केले होते. पुस्त्कांनी डॉ .आंबेडकरांना घडविले असे बानुगडे म्हणाले .
महात्मा जोतिराव फुले यांनी दु:खाचे मूळ अविद्या असल्याचे सांगितले. क्रोधाला प्रेमाने जगता येते हा संदेश फुले यांनी दिला . प्रश्न विचारा हा संदेश महात्मा फुले व डॉ.आंबेडकर यांनी दिला असून व्यवस्थेला प्रशासनाला व सरकारला प्रश्न विचारले पाहीजे असे बानुगडे म्हणाले .डॉ. आंबेडकर यांना घडविण्यात त्याचे वडिल रामजी यांचे मोठे योगदान होते.माणस बदलतात तुमचे कार्य प्रमाणिक व समाजासाठी असल पाहीजे असे ही बानगुडे म्हणाले.महात्मा फुले हे छत्रपती शिवाजी महाराज यांना गुरु मानतात व महात्मा फुले यांना भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर गुरु मानतात . महात्मा फुले यांनी वयाच्या २१ व्या वर्षी शाळा काढली समाजाचा प्रचंड दबाव असताना फुले दापत्यांनी मोठे शैक्षणिक कार्य केल्याचे बानुगडे म्हणाले .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितीन बारवकर यांनी केले . स्वागत विनोद भालेराव यांनी केले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button