Uncategorizedराष्ट्रीय

महात्मा फुले व भारतरत्न डॉ . आंबेडकर जयंती निमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सबा सय्यद , रुद्र फराटे व शुभांगी पवार यांचा प्रथम क्रमांक

आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या हस्ते बक्षीस वितरण

शिरुर दिनांक ( डेली न्यूज पोस्ट टीम -24)
शिरुर नगरपरिषद घोडनदी व राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले व विश्वरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर सयुंक्त जयंती उत्सव समिती शिरुर यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय वक्क्तृत्व स्पर्धेत
इयत्ता ११ वी ते इयत्ता १२ वी या गटात सबा जुबेर सय्यद यांनी ५ वी ते १० इयत्ता गटात रुद्र फराटे व इयत्ता rh १ ली ते ४ थी या गटात या विद्यार्थ्याचे प्रथम क्रमांक आले .
डॉ . आंबेडकर उद्यानात झालेल्या
या स्पर्धेसाठी ‘ छत्रपती संभाजी महाराजांचे साहित्य’, ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक विचार व आजची आधुनिक विचारसरणी’, ‘महात्मा फुलेंचे शैक्षणिक विचार व आजची शैक्षणिक धोरणे ‘असे विषय होते .
बक्षीस विजेत्यांना ट्रॉफी प्रमाणपत्र रोख रक्कम असे बक्षिस आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या हस्ते देण्यात आले .राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले व विश्वरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर सयुंक्त जयंती उत्सव समिती शिरुरचे अध्यक्ष विनोद भालेराव , समितीचे माजी अध्यक्ष रमेश गायकवाड , समितीचे सचिव प्रमोद गायकवाड , माजी नगरसेविका ॲड . माया गायकवाड ,प्रा .रतनकुमार ससाणे , प्रा. सुदाम वीर ,प्रा. विनोद शिंदे , प्रा . दत्ता शिंदे , प्रा.संतोष नगरे,   सचिन  जाधव ,मधुसूदन पाठक , सुनील जाधव ,प्रा.दीपक बनकर , प्रा . कृष्णा फराटे आदी उपस्थित होते .
गटनिहाय निकाल पुढील प्रमाणे :
इयत्ता १ ली ते ४ थी –
शुभांगी विकास पवार ( प्रथम क्रमांक )
जाधव स्वरा मयुर ( द्वितीय क्रमांक )
इयत्ता (५ वी ते १० वी )
फराटे रुद्र कृष्णा – (प्रथम क्रमांक)
साईरूद्र किरण गायकवाड – (द्वितीय क्रमांक)
यादव आराध्या निरंजन (तृतीय क्रमांक)
उत्तेजनार्थ क्रमांक –
नाबगे सावली मनोज
पवार पार्थ
इ. ११ वी १२ वी गट –
सय्यद सबा जुबेर – (प्रथम क्रमांक)
दसगुडे विश्वास संतोष -( द्वितीय क्रमांक)कु. पाचर्णे ऋतिका श्रीनिवास – (तृतीय क्रमांक)
उत्तेजनार्थ – जाधव राजेश कोडू
आमदार कटके यावेळी म्हणाले की भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी सांविधानाद्वारे सर्वाना न्याय देण्याचे ,आधिकार देण्याचे काम केले आहे . शिरुर येथील डॉ .बाबासाहेब आंबेडकर उद्यानात आकर्षक अशी स्वागत कमान उभारण्यात येईल .समाजोपयोगी उपक्रम समिती राबवित असल्याचे समितीचे कौतुक त्यांनी केले .
यावेळी प्रस्ताविक विनोद भालेराव यांनी केले . स्वागत प्रा . सुदाम वीर ,प्रा रतनकुमार ससाणे , प्रा . विनोद शिंदे यांनी केले . सूत्रसंचालन प्रा . संतोष नगरे यांनी केले तर आभार प्रमोद गायकवाड यांनी मानले . स्पर्धेचे परीक्षण सतीश धुमाळ
,विवेक घोडेवार,मयूरी नगरे यांनी केले .

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button