Uncategorizedनिधन वृत्त

मच्छिंद्र जाधव यांचे निधन

शिरूर (डेली न्यूज पोस्ट टीम -२४)
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर लाटेआळीतील मच्छिंद्र दशरथ जाधव वय -४८ यांचे अकस्मात निधन झाले.
त्याच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, बंधू असा परिवार आहे. जाधव हे लाटे आळी तील आझाद सोशल अँण्ड स्पोर्ट्स क्लब शिरूर चे सक्रिय कार्यकर्ते होते. अत्यंत मनमिळावू स्वभाव व सामाजिक कार्याची आवड मच्छिंद्र जाधव यांना होती.
माजी नगरसेविका पूजा नीलेश जाधव यांचे ते दीर होत. शिरूर नगरपरिषद कामगार संघटनेचे माजी अध्यक्ष द. पि. जाधव यांचे ते पुतणे होत. तर श्याम जाधव, गोरख जाधव, आरपीआयचे शहराध्यक्ष नीलेश जाधव यांचे ते बंधू होत.
जाधव यांच्या वर शोकाकुल वातावरणात शिरूरच्या अमरधाम स्माशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक विनोद भालेराव, शिवसेनेचे प्रमोद महाराज जोशी, सतीश व्यवहारे यांनी श्रद्धांजली अर्पण केली. माजी नगराध्यक्ष नसीम खान, राजेंद्र क्षीरसागर, विश्वास भोसले, रवींद्र ढोबळे,माजी नगरसेवक दादाभाऊ वाखारे, मंगेश खांडरे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती संतोष शितोळे, प्रशांत शिंदे, तुकाराम खोले, सामाजिक कार्यकर्ते किरण बनकर, सुशांत कुटे आदी यावेळी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button