शिरुर ( डेली न्यूज पोस्ट टीम -24)
येथील जीवन विकास मंदीर या शाळेतील विद्यार्थ्यानी जागतिक वसुंधरा दिनानिमित्त संपूर्ण जगाला भेडसावणारा कचरा समस्ये संदर्भात जनजागृती करत शून्य कचरा व्यवस्थापनाचा निर्धार करुन कचरा समस्ये संदर्भात जगजागृती करीता मोहिम सुरु केली आहे .
जगभरात वाढते तापमान , पर्यावरणाचा असमतोल त्याच बरोबर वाढत्या कचराची गंभीर समस्या निर्माण झाली आहे .या समस्येची विद्यार्थ्याना ओळख व्हावी व त्याबाबतचा उपाययोजनाची माहिती व्हावी या उद्देशाने जीवन विकास मंदिर शाळेतील इयत्ता ५ वी ते ९ वीतील ३५० हून विद्यार्थ्यानी शून्य कचरा व्यवस्थापन या प्रकल्पात सहभाग घेतला .
या मध्ये घरगुती प्लॅस्टिक कचरा संकलन , कापडी व कागदी पिशव्या तयार करणे , गटप्रकल्प यावर विद्यार्थ्यानी वेगवेगळे प्रकल्प तयार केले .१०० ते १५० कि. प्लॅस्टिक कचरा संकलन , कापडी व कागदी ७०० हून आधिक पिशव्या तयार केल्या व कचराचे निर्मूलन कसे करावे याबाबतची जाणीव जागृती याद्ववारे झाली असून
माझा कचरा माझी जबाबदारी व या कचराचे शास्त्रशुध्द पध्द्तीने विल्हेवाट लावण्याचे तंत्र या प्रकल्पा द्ववारे विद्यार्थ्यानी आत्मसात केले.
त्याच बरोबर कचरा समस्या संदर्भात पथनाट्य ही सादर केले .
या प्रकल्पातून तयार झालेल्या कापड व कागदी पिशव्याचे प्रदर्शन ही आयोजित करण्यात आले होते . प्रदर्शनाचा वेळी कृषिलोक विकास संशोधन संस्थेचे अध्यक्ष रवींद्र धनक , लोकजागृती संघटनेचे अध्यक्ष ॲड . ओमप्रकाश सतीजा , शिरुर नगरपरिषद कार्यालयीन अधीक्षक राहूल पिसाळ , शाळेचे विश्वस्त संजय बारवकर, माजी सभापती ॲड . प्रदीप बारवकर , सिने दिग्दर्शक दीपक घारु , सविता धनक , शिवाजी खरबस , मोहम्मद हुसेन पटेल ,
मुख्याध्यापक गंगाधर तोडमल , मुख्याध्यापक दिलिप शिंदे, ,निशा कोल्हे , डॉ . वैशाली साखरे , प्राची वाखारे ,स्टेट बॅकेंचे सेवानिवृत्त आधिकारी नंदकुमार पिंजरकर ,आदी उपस्थित होते .
जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्ताने शिरूर जीवन विकास मंदीर या शाळेतील विद्यार्थ्यानी सुका कचरा व ओला कचऱ्याचे विघटन कसे करायचे व प्लॅस्टीक कचरा , ई कचरा व केमीकल कचरा हा पर्यावरणाला किती घातक आहे, हे समजाविण्याचा उपक्रम राबविला हे कौतुकास्पद असल्याचे नंदकुमार पिंजरकर यावेळी म्हणाले .
शून्य कचरा व्यवस्थापन प्रकल्प संकल्पना कृषिलोक विकास संशोधन संस्थेचे अध्यक्ष रवींद्र धनक व संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली जीवन विकास मंदिर शाळेतील शिक्षकांनी राबविली .
जीवन विकास मंदिर शाळेतील विद्यार्थ्यानी रामलिंग महाराज यात्रेनंतर दुसरा दिवशी मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबविली होती .
