विशेष


शिरूर महसुली सजा विभाजन न झाल्याने मोठ्या प्रमाणात महसुली कागदपत्रासाठी व ग्रामपंचायत कामकाजासाठी अडचणी निर्माण होत आहेत .विभाजना बाबत वारंवार पत्रव्यवहार करण्यात येऊनही प्रशासकीय पातळीवर कोणतीही कार्यवाही होत असल्याचे दिसून येत नाही .त्यामुळे चारही गावचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपोषनाच्या तयारीत आहेत. सदर काम १५ दिवसाच्या आत न झाल्यास तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे .