शिरुर ( टीम डेली न्यूज पोस्ट -24)
येथील जुन्या पिढीतील श्रीमती अनूसया सोन्याबापू लांडे वय -९५ वर्ष यांचे वृध्दापकाळाने निधन झाले .
परिसरातील धार्मिक सामाजिक कार्यात त्यांच्या सहभाग असायचा . शहरातील विद्याधाम प्रशाला शाळेसमोर त्यांची चॉकलेट गोळ्या बिस्किट विक्रीची हातगाडी होती .
सदगृरु कृपा सुंगधालयचे प्रमुख दशरथ लांडे , व्यवसायिक संभाजी लांडे व स्वर्गिय मुरलीधर लांडे व शिवाजी लांडे यांच्या त्या मातोश्री होत . तर हलवाई चौक गणेश मित्र मंडळाचे माजी अध्यक्ष प्रसाद लांडे,फिटर सदा लांडे , सचिन लांडे यांच्या त्या आजी होत .
दशक्रिया विधी – रविवार दिनांक -२० एप्रिलला घोडनदी किनारी कुंभार घाट कुंभार आळी , शिरुर येथे सकाळी ८ वाजता होणार आहे .