शिवीगाळ दमदाटी करुन सत्तुरने वार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल
शिरूर दिनांक ( डेली न्यूज पोस्ट टीम -24)
तु काय मोठा डॉन आहेस का? तु आमच्या वस्तीतील मुलींना त्रास देत असतो, थांब आता तुझ्याकडे बघतोच” असे म्हणुन शिवीगाळ, दमदाटी करून सत्तुरने वार करून गंभीर दुखापत केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार संदीप गोरख लोखंडे वय ३२ वर्षे, धंदा शेती रा. रांजणगाव सांडस, लोखंडेवस्ती ता. शिरूर जि. पुणे यांनी करण राजेंद्र भंडलकर रा. रांजणगाव सांडस ता. शिरूर जि. पुणे यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे .
१३ एप्रिल रोजी रांजणगाव सांडस ग्रामपंचायत सार्वजनिक रोडवर करण भंडलकर याचे घरासमोर गावामधील भैरवनाथ देवाची यात्रेचा छबीना मिरवणूक चालु असताना मिरवणुकीमध्ये संदिप लोखंडे यांच्या पुतण्याला धक्का लागला याबाबत भंडलकर यांना विचारणा केली असता त्याचा राग व त्याचे वस्तीमधील मुलगी हीचेशी जवळीक साधुन का गप्पा मारीत असतो या कारणावरून त्याचा राग मनात धरून करण भंडलकर याने “तु काय मोठा डॉन आहेस का? तु आमच्या वस्तीतील मुलींना त्रास देत असतो, थांब आता तुझ्याकडे बघतोच”
असे म्हणुन शिवीगाळ, दमदाटी करून सत्तुरने लोखंडे यांच्याडावे हाताचे खांद्यावर, कपाळवर वार करून गंभीर दुखापती केली . पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली आधिक तपास पोलीस हवालदार भोते करीत आहे .