क्राईम

कामगार पुरविण्याचा नावाखाली ११ लाख ९ हजार रुपये ची रक्कम घेवून कामगार न पुरवता आर्थिक फसवणूक गेल्या प्रकरणी गुन्हा दाखल

शिरुर दिनांक ( वार्ताहर )
उसतोड कामगार पुरविण्याचे नावाखाली  अकरा लाख नऊ हजार एवढी रक्कम घेवून कामगार पुरविले नाहीत व  दिलेली रक्कम परत न करता  आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
या प्रकरणी  दत्तात्रय शहाजी फराटे वय ३७ धंदा-शेती रा. मांडवगण फराटा ता. शिरूर जि. पुणे  यांनी
 गोकुळ चत्रु पवार, 2) चत्रु तोताराम पवार, 3) अशोक चत्रु पवार, सर्व रा. नागद सोनवडी ता. कन्नड जि. छत्रपती संभाजीनगर यांच्या विरोधात तक्रार दिली आहे .
६ मे २०२४ ते ५ नोव्हेंबर २०२४ च्या दरम्यान  1) गोकुळ चत्रु पवार, 2) चत्रु तोताराम पवार, 3) अशोक चत्रु पवार, सर्व रा. नागद सोनवडी ता. कन्नड जि. छत्रपती संभाजीनगर यांनी उसतोड कामगार पुरविण्याचे नावाखाली फराटे यांच्याकडून  वेळोवेळी 11,09,000/रू. (अक्षरी अकरा लाख नऊ हजार) एवढी रक्कम घेवून कामगार पुरविले नाहीत व दिलेली रक्कम परत न करता आर्थिक फसवणूक केल्याचे फराटे यांनी तक्रारीत म्हटले आहे . पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार खबाले करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button