Uncategorized
शिरुर शहरातून दोन जण बेपत्ता
शिरुर ( डेली न्यूज पोस्ट टीम )
शिरुर शहरातून दोन जण बेपत्ता झाले असून या संदर्भात पोलीस स्टेशनला खबर देण्यात आली आहे .
याबाबत नंदा संजय आगळे वय -४३
व्यवसाय – शिवणकाम, रा. जोशीवाडी शिरूर ता. शिरूर जि. पुणे यांनी शिरुर पोलीस स्टेशनला खबर दिली आहे .
११ एप्रिल २०२५ रोजी शिरूर बसस्थानक येथे संजय सदाशिव आगळे वय ४७ वर्ष यांना मुलगी गायत्री हिने त्यांना मुळ गावी मिरी ,ता. पाथर्डी जि.नगर येथे जाणेसाठी नगर बस मध्ये बसवुन दिले परंतु ते गावी न जाता कोठेतरी कोणास काही एक न सांगता निघुन गेले आहे .
संजय सदाशिव आगळे यांचा वर्ण सावळा उंची ५ फुट ५ इंच बांधा सडपातळ आंगात नेसणीस निळे रंगाचा शर्ट काळे रंगाची पॅन्ट पायात चप्पल उजवे हातावर इंग्रजी अक्षरात एन एस असे गोंधलेले व उजवे डोळ्याचे वर टाके पडलेले व्रण आहेत .
दरम्यान शीला सुरेश मराठे वय ६३, व्यवसाय गृहीणी रा. गुजरमळा ,शिरूर ता. शिरूर, जि . पुणे मुळ रा .तळोदा, ता. तळोदा, जि .नंदुरबार यांनीही आपला मुलगा मिसिंग झाल्याची खबर दिली आहे .१४ एप्रिलला गुजरमळा शिरूर ,ता. शिरूर, जि. पुणे येथुन गिरीश सुरेश मराठे वय ४४ वर्ष हे माझे बाहेर काम आहे मी येतो थोडा वेळात तुम्ही जेवण करून घ्या, असे म्हणुन घरातुन निघुन गेले असुन अदयाप पर्यंत घरी आलेले नाही .
मराठे यांचा वर्ण गोरा असून उंची ५ फुट ५ इंच बांधा मजबुत केस बारीक मिशी राखलेली अंगात कॉलरचा निळे रंगाचा हाप बाहीचा टिं शर्ट काळे रंगाची पॅंट आहे .
याबाबत पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे .