विशेषशैक्षणिक

स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी 331 विद्यार्थ्यांना नवीन सायकल भेट . विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास होणार सुलभ.

शिरूर दिनांक ( डेली न्यूज पोस्ट टीम -24)
पुणे जिल्हा परिषद, यांच्या वतीने
“सायकलचा आधार, भविष्याला आकार ” हा हृदयस्पर्शी सायकल बँक उपक्रमांतर्गत ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थिनींना शालेय शिक्षणासाठी सायकल देण्यात आल्या.शिरूर तालुक्यात या उपक्रमांतर्गत 331 सायकली गरजू मुलींना देण्यात आल्याची माहिती गटविकास अधिकारी महेश डोके यांनी दिली.
अनेक विद्यार्थी दूर अंतरावरून शाळेत ये-जा करत असतात. सार्वजनिक वाहतूक मर्यादित असल्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणींना सामोरे जावे लागते. या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवास अधिक सुलभ व्हावा, म्हणून जिल्हा परिषद ने नवीन सायकल दान देऊन एका मुलीच्या जीवनाचा प्रवास सुलभ करूया असे आवाहन केले होते .
गावातील दानशूर व्यक्तींनी गावातील जिल्हा परिषद शाळेत १५ ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात सायकल दान कराव्यात असे आवाहन केल्यावर
शिरूर तालुक्यातून एकूण 331 सायकल जमा झाल्या. यामध्ये सरपंच, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य , ग्राम पंचायत अधिकारी, दानशूर व्यक्ती, सर्व शिक्षक संघटना आणि शिक्षक, अधिकारी कर्मचारी यांचा सहभाग आहे. यामध्ये गोलेगावातून- 10 , करंजावणे- 3, पिंपळे खालसा -10, सोने सांगवी- 2, शिरूर ग्रामीण -2, न्हावरा -1, बाभुळकर बुद्रुक -6, कर्डे -3, वरुडे -1, जातेगाव बुद्रुक -2, आण्णापूर -18, शिरसगावा काटा -4, निमोणे -24, काठापूर खुर्द,-5,धानोरे -1, रांजणगाव सांडस-7, रांजणगाव गणपती-2, दहिवडी-1 तर्डोबाची वाडी -6, सरदवाडी -02,खैरेवाडी -06, केंदुर -03, पारोडी -15, संविदणे 04, कोंढापुरी -04, तळेगाव -18, मलठण -16, कवठे येमाई -02, पाबळ -01, निमगाव म्हाळुंगी -02 अश्या सायकली देण्यात आल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button