ॲन्टी करप्शनच्या पुणे कडून ग्रामपंचायत भांबर्डे, ता. शिरुर, जि. पुणे येथील ग्रामपंचायत अधिकारी यांचेवर लाच मागणी व लाच स्विकारले प्रकरणी कारवाई.
पेवर ब्लॉक बसवलेल्या कामाच्या बिलाचा मोबदला म्हणुन दहा हजार रुपये तसेच ग्रामपंचायत हद्दीतील अंगणवाडी बांधकामातील उर्वरित बिलाचे चेक काढण्याचा मोबदला म्हणून पन्नास हजार रुपये असे एकूण साठ हजार रुपये लाच रक्कम स्विकारताना पकडले

शिरुर दिनांक ( वार्ताहर )
भांबर्डे ता . शिरुर येथे पेवर ब्लॉक बसवलेल्या कामाच्या बिलाचा मोबदला म्हणुन दहा हजार रुपये तसेच ग्रामपंचायत हद्दीतील अंगणवाडी बांधकामातील उर्वरित बिलाचे चेक काढण्याचा मोबदला म्हणून पन्नास हजार रुपये असे एकूण साठ हजार रुपये लाच रक्कम ग्रामपंचायत कार्यालय भांबर्डे येथे पंचासमक्ष ग्रामपंचायत आधिकारी निर्मला कैलास भुजबळ वय -४४ यांनी स्विकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले असून, त्यांचे विरुद्ध रांजणगांव एमआयडीसी पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन १९८८ चे कलम ७अन्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
यातील तक्रारदार यांनी सन २०२० – २०२१ मध्ये ग्रामपंचायत भांबर्डे येथे पेवर ब्लॉक बसवले असून त्या कामाच्या बिलाचा मोबदला तसेच त्यांनी ग्रामपंचायत हद्दीतील अंगणवाडीचे केलेल्या बांधकामातील उर्वरित बिलाचे चेक काढण्याचा मोबदला म्हणून लोकसेवक श्रीमती निर्मला भुजबळ यांनी तक्रारदाराकडे एकुण बिलाच्या सहा टक्के अथवा ६०,००० रुपयाची लाच मागणी केल्याची तक्रार दि. २७ मार्च २०२५ रोजी तक्रारदार यांनी लाच लूचपत प्रतिबंधक विभाग पुणे येथे दिली होती.
प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने दि. १/०४/२०२५, दि. ३/०४/२०२५ व दि. १५/०४/२०२५ रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता, लोकसेवक श्रीमती निर्मला भुजबळ यांनी वरील नमुद कामासाठी तक्रारदाराकडे एकुण बिलाच्या सहा टक्के अथवा ६०,००० रुपये लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले. दि. २८ एप्रिल २०२५ रोजीच्या सापळा कारवाईमध्ये लोकसेवक श्रीमती निर्मला भुजबळ यांनी तक्रारदाराकडून ग्रामपंचायत भांबर्डे येथे पेवर ब्लॉक बसवलेल्या कामाच्या बिलाचा मोबदला म्हणुन १०,००० रुपये तसेच ग्रामपंचायत हद्दीतील अंगणवाडी बांधकामातील उर्वरित बिलाचे चेक काढण्याचा मोबदला म्हणून ५०,००० रुपये असे एकूण ६०,००० (साठ हजार) रुपये लाच रक्कम ग्रामपंचायत कार्यालय भांबर्डे येथे पंचासमक्ष स्विकारली असता
त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले असून, त्यांचे विरुद्ध रांजणगांव एमआयडीसी पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन १९८८ चे कलम ७अन्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
ही कारवाई पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र, पुणे व अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे, ला.प्र.वि. पुणे यांचे
मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.
लोकसेवक शासकीय अधिकारी / कर्मचारी किंवा त्यांच्यावतीने खाजगी इसम (एजंट) हे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास त्याबाबत तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास खालील नमूद क्रमांकवर सपंर्क साधण्याचे आवाहन श्री. शिरीष सरदेशपांडे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे यांनी केले आहे.