शिरूर ( डेली न्यूज पोस्ट टीम -२४)महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत फेब्रुवारी – २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इ.५वी व ८ वी च्या शिष्यवृत्ती परीक्षेत येथील विद्याधाम प्रशालेच्या ६१ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवून जिल्ह्यात सर्वाधिक विद्यार्थी शहरी विभागाच्या गुणवत्ता यादीत येण्याची प्रशालेची दैदिप्यमान परंपरा कायम राखली.
शिवाय या निकालाचे वैशिष्ट्य असे की, प्रशालेतील इ.५ वी च्या ४ व इ.८ वी च्या ५ अशा तब्बल ९ विद्यार्थ्यांनी एकाच वेळी राज्याच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवले असून हा एक उच्चांक असल्याची प्रतिक्रीया प्रशालेचे प्राचार्य गुरुदत्त पाचर्णे यांनी दिली.
याच बरोबर इ.५ वी तील गौरेश दांडेकर (२८२ गुण) राज्यात ७वा, हर्षवर्धन बरडे (२७४ गुण) राज्यात १४ वा, प्रथमा दरेकर (२७२गुण) राज्यात १६ वी तर इ.८ वी तील मयुरेश सानप (२८० गुण) राज्यात ८वा, समिक्षा यादव (२७८ गुण) राज्यात १० वी, ऋग्वेद सरोदे (२७४ गुण) राज्यात १४ वा, संस्कार थोरे (२७४ गुण) राज्यात १४ वा आणि अमित कारखिले (२७२ गुण) राज्यात १६वा या विद्यार्थ्यांनी राज्याच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवल्याची माहिती
शिष्यवृत्ती विभाग प्रमुख दीपक गुजर व जयश्री गवंड यांनी दिली.

