Uncategorized

सिताबाई थिटे बी. फार्मसी कॉलेजमध्ये पूल कॅम्पस ड्राईव्हद्वारे २४ विद्यार्थ्यांची सुमासॉफ्ट कंपनीत निवड

शिरूर (डेली न्यूज पोस्ट टीम २४ ): सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी, शिरूर येथे  सुमासॉफ्ट प्रायव्हेट लिमिटेड, पुणे या नामांकित आयटी कंपनीच्या सहकार्याने पूल कॅम्पस ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एकूण ३०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी गुणवत्ता चाचणी, मुलाखती अशा टप्प्यांतून २४ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

यावेळी सुमासॉफ्ट कंपनीकडून प्रोजेक्ट मॅनेजर  सचिन चाळके यांनी विद्यार्थ्यांना कंपनीची माहिती दिली तसेच त्यांच्या भूमिकेबाबत मार्गदर्शन केले. त्यांच्यासोबत प्रोजेक्ट मॅनेजर  चिन्मय नाईक, एचआर मॅनेजर सुमित टानपुरे, एचआर टीम लीडर विजय  जाधव, टीम कोच  नारायणराव वैतळा, सब्जेक्ट मॅटर एक्स्पर्ट  आदर्श सावंत आणि  प्रणव खैरे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. द्वारकादास बाहेती होते. त्यांनी विद्यार्थ्यांना विविध उद्योग क्षेत्रांमध्ये प्लेसमेंटच्या संधींबाबत मार्गदर्शन करत प्रेरणा दिली. डी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. अमोल शहा यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचे समन्वयक डॉ. सचिन कोठावदे यांनी संस्थेतील प्लेसमेंट सेलच्या विविध उपक्रमांची माहिती दिली आणि आगामी वर्षातील योजना सांगितल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मनोज तारे यांनी केले तर प्रा. विजया पडवळ यांनी आभार प्रदर्शन केले. श्री छत्रपती संभाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र थिटे, सचिव धनंजय थिटे, हर्षवर्धन थिटे आणि समन्वयक शिवाजीराव पडवळ यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button