Uncategorized
जुन्या पिढीतील व्यवसायिक नारायण सोनाजी क्षीरसागर यांचे निधन
शिरुर (डेली न्यूज पोस्ट टीम )
येथील व्यवसायिक नारायण सोनाजी क्षीरसागर वय -७५ यांचे निधन झाले आहे .
त्यांच्या पश्चात पत्नी , ३ मुले , २ विवाहित मुली , सूना जावई , १३ नातवंडे असा मोठा परिवार आहे .
नारायण क्षीरसागर हे कष्टाळू व्यवसायिक होते .सायकल वरुन परिसरातील वाड्या वस्ती व गावा मध्ये जावून त्यांनी भांडी विक्रीचा व्यवसाय केला .
जिजामाता महिला सहकारी बॅकेतील आधिकारी धनराज क्षीरसागर ,अशोक क्षीरसागर व किराणा दुकानदार शंकर क्षीरसागर यांचे ते वडिल होत .
क्षीरसागर यांच्या दशक्रिया विधी गुरुवार दिनांक १ मे २०२५ रोजी कुंभार घाट , घोडनदीतीरी शिरुर येथे होणार आहे .

