धार्मिंकराष्ट्रीय

ब्राम्हण सभा शिरुर यांचा वतीने शिरुर येथे भगवान परशुराम जन्मोत्सव उत्सहात

पालखी मिरवणूक , रामजप , प्रवचन व महाप्रसादाचे आयोजन

शिरुर दिनांक ( वार्ताहर )
ब्राम्हण सभा शिरुर यांच्या वतीने भगवान परशुराम जन्मोत्सव उत्सहात साजरा करण्यात आला .
स्टेट बॅक कॉलनी शिरुर येथील घाटपांडे यांच्या श्री . गजानन महाराज मंदिरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
यावेळी परिसरातून भगवान परशुराम मूर्तीची पालखी मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी सामूदायिक रामरक्षा पठण करण्यात आले . भगवान परशूराम मूर्तीची पूजा व अभिषेक करण्यात आला. त्यानंतर भगवान परशूराम जन्मोत्सवाचा कार्यक्रम पार पडला . भगवान परशूराम यांच्या वरील प्रवचन विद्याधाम प्रशालेचे माजी शिक्षक डी . एस कुलकर्णी यांचे झाले .
भगवान परशुराम यांच्या जीवन कार्याचा आढावा त्यांनी घेतला . भगवान परशुराम यांनी वेद विद्या व शस्त्रविद्या यांचा समन्वय साधून समर्थ जीवन जगावे अशी शिकवणूक दिल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले .
बालाजी विश्व विद्यालयाचे मुख्याध्यापक विनायक म्हसवडे म्हणाले भगवान परशुराम यांच्या जीवनाचा अभ्यास करुन भगवान परशुराम यांच्या विचारांचा अभ्यास करावा . समाजाला दिशा देण्यासाठी ब्राम्हण सभेने पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले .भविष्यातील आव्हाने लक्षात घेवून पुढील पिढी आधिक सक्षम ज्ञानी , समर्थ करणे आवश्यक आहे असे ही ते म्हणाले . विनायक मुळे काका यांनी ही भगवान परशूराम यांच्या जीवनाची माहिती दिली .
यावेळी शिरुर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष ॲड . सुभाष पवार , लोकजागृती संघटनेचे ॲड . ओमप्रकाश सतीजा , प्राचार्य डॉ .समीर ओंकार , विद्याधाम प्रशालेचे माजी मुख्याध्यापक व्ही .डी .कुलकर्णी , प्रा. चैत्यन वाघ , प्रमोद काशीकर , माजी शिक्षक विजयकुमार गोरे , प्रसाद मुळे ,राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे धोंगडे मामा , प्रफुल्लकुमार कुलकर्णी , विद्याधाम प्रशालेचे सेवानिवृत्त शिक्षक संजय देशपांडे , डॉ. विश्वास मुळे, प्रदीप कुलकर्णी ॲड . सीमा प्रमोद काशीकर , अनघा पाठकजी , विद्याधर कुलकर्णी , तात्यासाहेब अवचट , केतन गोसावी आदी उपस्थित होते .

प्रसिद्ध सराफ व्यावसायिक धरमचंदजी फुलफगर यांना वाढदिवसाच्या डेली न्यूज पोस्ट टीम चा वतीने हार्दिक शुभेच्छा

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलास गोसावी यांनी केले .सुत्रसंचालन आदिती जोशी यांनी केले .आभार चैतन्य वाघ यांनी मानले महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
पुढील वर्षी भव्य प्रमाणात भग्स्वान परशुराम जन्मोत्सव करण्याचा व ब्राम्हण सभा शिरुरचा वतीने विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प करण्यात आला .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button