विशेष

१४ लाख रुपये किमंतीच्या मातीचे उत्खणन

खाण आणि खनिज (नियमन आणि विकास) अधिनियम १९५७ -- ४ अ पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६  -- ९,१५ नुसार गुन्हा दाखल


शिरूर दिनांक ( डेली न्यूज पोस्ट टीम )कोळगाव डोळस , ता . शिरुर येथे अज्ञात चोरट्याने १४ लाख १७ हजार ८० रु . किमंतीची १६८७ ब्रास काळी माती चोरुन नेली आहे . याबाबत खाण आणि खनिज (नियमन आणि विकास) अधिनियम १९५७ — ४ अपर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६  — ९,१५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार ग्रामसभा आधिकारी हर्षद बाळासाहेब साबळे वय २९ वर्ष   सध्या राहणार – बाबुराव नगर शिरूर ता शिरूर जि. पुणे मूळ रा.पारगाव सुद्रिक तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर  यांनी  अज्ञात चोरटा विरोधात फिर्याद दिली आहे . 

प्रसिद्ध सराफ व्यावसायिक धरमचंदजी फुलफगर यांना वाढदिवसाच्या डेली न्यूज पोस्ट टीम चा वतीने हार्दिक शुभेच्छा

१ एप्रिल २०२५ रोजी  रात्री ११ ते दि. ५ एप्रिल २०२५  रोजीच्या दरम्यान   कोळगाव डोळस ता शिरूर जि. पुणे येथील जमीन गट नंबर ११७  यामधील १४ लाख १७ हजार ८० रु किमंतीची १६७८   ब्रास काळी माती

अज्ञात चोरट्याने स्वंत: च्या आर्थिक फायद्यासाठी जे.सी.बी व हायवा या साधनाने गौण खनिजाचे उत्खनन  करून शासनाची कोणतीही परवानगी न घेता चोरी करून नेली आहे .

याबाबत आधिक तपास  पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शिंदे करीत आहेत .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button