इनामगावचे सुपुत्र व सांगलीचे उपप्रादेशिक परिवहन आधिकारी प्रसाद गाजरे यांच्या कामगिरीची इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डर्स कडून दखल

शिरुर दिनांक ( वार्ताहर )
इनामगाव ता . शिरुर येथील व सध्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सांगली येथे कार्यरत असणारे प्रसाद गाजरे यांच्या कामगिरीची दखल ‘ इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स” यांनी घेतली आहे .
प्रसाद गाजरे यांनी वाढत्या रस्ते अपघातांनबाबत नागरिकांमध्ये रस्ते सुरक्षा जागरूकता निर्माण करण्यासाठी आरटीओ विभागाकडून रस्ता सुरक्षा कार्यक्रम नाविन्यपूर्ण पद्धतीने राबविण्याच्या उद्धेशाने

रॅपलिंग करताना रस्ता सुरक्षा संदेश देण्यासाठी रस्ता सुरक्षा फलक हरिश्चंद्र गड येथील कोकण कड्यावरून गाजरे यांनी महाराष्ट्रातील ४६७१ फूट उंच कोकण कड्यांपासून १८०० ( पाहिला टप्पा १०००फूट दुसरा टप्पा ५०० फूट व तिसरा टप्पा ३०० फूट) रॅपलिंग करताना, त्यांनी रस्ता सुरक्षा जागरूकतेबद्दल बॅनर दाखवले. कमी वेळात आणि प्रभाविपणे हा संदेश लोकांपर्यंत जलद पोहोचवण्यात आला याची दखल ” इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स” यांनी घेतली आहे .
इनामगावचे सुपूत्र प्रसाद गाजरे याच्या कामगिरी बद्दल सामाजिक कार्यकर्ते तुकाराम मचाले व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे .
