क्राईम

पाटबंधारे खात्याच्या बंद खोलीचे दार तोडून २ लाख ५२ हजार ५२५ रु . किमंतीचे पुलाचे साहित्य अज्ञात चोरट्याने चोरुन नेले .

शिरूर  दिनांक ( डेली न्यूज पोस्ट -24 टीम ) पाटबंधारे खात्याच्या बंद खोलीचे कूलूप तोडून त्याठिकाणी असणारे पुलाच्या  कामाचे २ लाख ५२ हजार ५२५ रु चे साहित्य अज्ञात चोरट्याने चोरुन नेले आहे .

प्रसिद्ध सराफ व्यावसायिक धरमचंदजी फुलफगर यांना वाढदिवसाच्या डेली न्यूज पोस्ट टीम चा वतीने हार्दिक शुभेच्छा

कवठे येमाई , ता . शिरुर येथे हा प्रकार घडला .या संदर्भात पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार   अजित बाळू येवले वय २५ वर्षे व्यवसाय नोकरी (स्ट्रक्चर इंजिनियर ) रा. रेनवडी ता. पारनेर जि. अहिल्यानगर यांनी  अज्ञात चोरटा विरोधात फिर्याद दिली आहे .२५ एप्रिल  रोजी रात्री साडेदहा वाजता ते दि .२६ एप्रिल  रोजी पहाटे ३  च्या दरम्यान कवठे येमाई गावाला जोडणाऱ्या घोडनदी कडेला असलेल्या पाटबंधारे विभागाच्या  बंद खोली व बंद पत्र्याचे शेडचे कुलूप कशाचे तरी सहाय्याने तोडून अज्ञात चोरट्याने आत  प्रवेश केला व रस्त्याचे पुलाचे कामासाठी लागणारे  २ लाख ५२ हजार ५२५ रु  किमंतीचे रुपयाचे साहित्य चोरुन नेले .या संदर्भात पोलीस नि्रीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनि्रीक्षक पवार तपास करीत आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button