विशेष

अनाधिकृतपणे सळई कटिंग मशीन चालवलेल्या घटनेची चौकशी व्हावी

शिरुर दिनांक ( वार्ताहर ) शिरुर नगरपरिषद आवरात  लोखंडी  सळ्या कापण्यासाठी  मशिनला वीज कोठून वापरली जात आहे यांचा शोध घ्यावा  अशी मागणी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद यांनी करत 
 शिरुर नगरपरिषदेचा ताबा ठेकेदारांनी घेतल्याचा आरोप केला  आहे .
याबाबत जिल्हाधिकारी पुणे यांना निवदेन देण्यात आले असल्याचे सांगून सय्यद म्हणाले  की  गेल्या  २-३ महिन्यांपासुन शिरुर  नगरपरिषद कार्यालयाच्या आवारामध्ये लोखंडी सळई कापण्यासाठी मशीन चालविली जात आहे. सदरचे काम रात्रीच नव्हे तर दिवसाढवळ्या सर्व प्रशासकीय कर्मचारी व आधिकारी याच्या समोर चालले आहे. परंतु आजतागायत काम करणा-या व्यक्तीस कोणीही जाब विचारला नाही कोण काम करत आहे . सळई कापण्यासाठी लागणा-या  मशीनला लाईट कोठून घेण्यात आलेली आहे याचा साधा जाब कोणीही विचारला नाही. पालिकेतील एलईडी टीव्हीचा निदर्शनास ही बाब कशी लक्षात आली नाही . शिरुर नगरपरिषदेचा ताबा हा ठेकेदार यांनी घेतला असल्याचा आरोप सय्यद यांनी केला आहे .
अनाधिकृतपणे सळई कटिंग मशीन चालवून सदर ठेकेदाराने लाखो रुपयांची  चोरी केली असून या घटनेची चौकशी व्हावी अशी मागणी सय्यद यांनी केली आहे .

ॲड . प्रतिक प्रमोद काशीकर यांना डेली न्यूज पोस्ट टीमचा वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .
ॲड . प्रतिक प्रमोद काशीकर यांना डेली न्यूज पोस्ट टीमचा वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button