विशेषशैक्षणिक

यशस्वी उद्योजक होण्यासाठी अपयश पचविणे महत्वाचे

उर्जा उद्योग समूहाचे उद्योजक प्रकाश कुतवळ यांचे मत

उद्योजक प्रकाश कुतवळ शिरुर येथील कार्यक्रम प्रसंगी


शिरुर ( टीम डेली न्यूज पोस्ट -24) यशस्वी उद्योजक होण्यासाठी अपयश पचविणे महत्वाचे  असल्याचे प्रतिपादन उर्जा उद्योग समूहाचे प्रमुख उद्योजक प्रकाश कुतवळ शिरुर येथे केले  .
येथील चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयातील वाणिज्य विभागातील तृतीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नूकताच निरोप समारंभ संपन्न झाला . या निरोप समारंभावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . के. सी. मोहिते हे अध्यक्षस्थानी होते . तर प्रमुख पाहूणे म्हणून उद्योजक प्रकाश कुतवळ हे उपस्थित होते .
कुतवळ म्हणाले की कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी व्यावसायिक क्षेत्रामध्ये आपले पाऊल टाकावे तसेच यशस्वी उद्योजक बनण्यासाठी अपयश पचवता येणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे सांगुन विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात करीयर करावे व आपण ज्या क्षेत्रात कार्यरत राहणार आहोत त्या क्षेत्रात होणा-या बदलाची माहिती सातत्याने जाणून घ्यावे असे आवाहन ही त्यांनी केले .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाणिज्य विभागाच्या प्रमुख डॉ. रेणुका करपे यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी वाणिज्य विभागातील यशस्वी विद्यार्थ्यांची यशोगाथा सांगितले . प्राचार्य डॉ. मोहिते यांनी विद्यार्थ्यांना विविध उदाहरणांद्वारे भविष्यातील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले तसेच वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांना असणाऱ्या शिस्तीबाबत कौतुक केले. सूत्रसंचालन मंजुषा नहार व कुमुद ढोले यांनी केले. आभार प्रा. विलास निचित यांनी मानले. यावेळी बी.व्होक. विभागाचे डॉ. अरुण दिवटे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ. मंजुषा पाटील प्रा.अश्विनी येळे प्रा. आरती अनाप , प्रा. नेहा लोंढे प्रा.भगत पायल व प्रा .काजल भाटी यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button