Uncategorizedक्राईम

मित्राचा मोबाईल  घेवून त्यातील फोन पे अप्लिकेशन मधून मास्टर हरेश दत्तात्रय भिसे या बॅक खात्यावर वेळोवेळी ८३ हजार रुपये ट्रान्सफर  करत विश्वासघात करून अपहार

शिरूर दिनांक ( वार्ताहर )मित्राचा मोबाईल  घेवून त्यातील फोन पे अप्लिकेशन मधून मास्टर हरेश दत्तात्रय भिसे या बॅक खात्यावर  वेळोवेळी ८३ हजार रुपये ट्रान्सफर  करत विश्वासघात करून अपहार केल्या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

   याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार  संदेश मारुती वाघचौरे वय २३ वर्षे ,राहणार – पिंपरखेड  ता. शिरूर जि. पुणे यांनी  सुयश दत्तात्रय पाटील, रा .कराड , ता . कराड जि. सातारा व  मास्टर हरेश दत्तात्रय भिसे यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे .

१५ फेबृवारी २०२५ ते  २१ फेबृवारी २०२५ च्या  दरम्यान पिंपरखेड ता. शिरूर जिल्हा पुणे येथे संदेश वाघचौरे हे  मावशीचे घरी त्याच्या  कंपनीत काम करणारा मित्र सुरेश दत्तात्रय पाटील असे राहण्यासाठी आले असताना  सुयश दत्तात्रय पाटील यानी संदेश वाघचौरे यांचा विश्वासाने मोबाईल फोन घेतला व  त्यामधील फोन पे अप्लिकेशन मधून मास्टर हरेश दत्तात्रय भिसे या खात्यावर वेळोवेळी ८३ हजार रुपये ट्रान्सफर करुन विश्वासघात करून अपहार केला व  त्यानंतर पाटील हे चाकण येथील रूम सोडून निघून गेले   . सुयश दत्तात्रय पाटील  व मास्टर हरेश दत्तात्रय भिसे या खात्याचे खातेदाराविरुद्ध वाघचौरे यांनी  फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार  जगताप तपास करीत आहेत .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button