क्राईम
मित्राचा मोबाईल घेवून त्यातील फोन पे अप्लिकेशन मधून मास्टर हरेश दत्तात्रय भिसे या बॅक खात्यावर वेळोवेळी ८३ हजार रुपये ट्रान्सफर करत विश्वासघात करून अपहार
मित्राचा मोबाईल घेवून त्यातील फोन पे अप्लिकेशन मधून मास्टर हरेश दत्तात्रय भिसे या बॅक खात्यावर वेळोवेळी ८३ हजार रुपये ट्रान्सफर करत विश्वासघात करून अपहार
Related Articles
Check Also
Close
शिरुर दिनांक ( वार्ताहर )“सरकारी नोकरी लावण्याचे अमिष दाखवुन ३३ लाखांची फसवणुक करणा-या महीला आरोपीस शिरुर पोलीसांनी जेरबंद केले आहे .
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार विकास भिमराव नागरगोजे रा – जोशीवाडी ,शिरूर, ता. शिरूर ,जि. पुणे यांनी याबाबत फिर्याद दिली होती की ऑगस्ट २०२३ पासून ते दि. ४ एप्रिल २०२५ रोजी अखेर पर्यंत निशा लक्ष्मण शिंदे रा. इंदापुर ,ता. इंदापुर, जि. पुणे यांनी विकास नागरगोजे व त्यांचे ओळखीचे लोकांना मी मुलांना सरकारी नोकरी लावण्याचे काम करते. तुमच्याकडे कोणी विद्यार्थी असेल तर मला सांगा मी त्याला सरकारी नोकरी लावते. माझे वरपर्यंत ओळखी आहेत असा विश्वास देवून नागरगोजे व त्यांचे सहाकरी यांचेकडून नागरगोजे यांचे पत्नीचे एच.डी. एफ.सी. बँक शिरूर या खात्या वरून निशा शिंदे यांचे एच.डी.एफ.सी. शाखा इंदापूर या अकाउंटवर २३,४६,०००/-रु. व रोख स्वरूपात १०,०००,००/- रू (अक्षरी दहा लाख) असे एकुण ३३,४६,०००/-रु. ( तेहत्तीस लाख शेहचाळीस हजार) एवढी रक्कम घेतली
व नागरगोजे व त्यांचे सहकारी यांची आर्थिक फसवणुक केली . याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला व अधिक तपास पोलीस हवालदार शिवाजी बनकर हे करीत होते .
ही कारवाई पोलीस अधिक्षक पंकज देशमुख , अप्पर पोलीस अधिक्षक श रमेश चोपडे , उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले , पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शिवाजी बनकर, महिला पोलीस अंमलदार स्नेहल होळकर, पोलीस अंमलदार विजय शिंदे यांचे पोलीस पथकाने केली .