Uncategorizedक्राईम
शिरुर येथील वीज वितरण कार्यालयाच्या बाहेर ठेवलेले ॲल्युनियम कंन्डक्टर व एम एम. केबल चोरट्याने चोरुन नेले
शिरुर दिनांक ( डेली न्यूज पोस्ट टीम )एमईसीबी कार्यालयाचा बाहेर ठेवलेल्या ४० हजार रु. किमंतीच्या ॲल्युनियम कंन्डक्टर व एम एम. केबल चोरट्याने चोरुन नेल्या आहेत .याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मानसिंग जगदिश नेवसे वय 35 वर्षे, धंदा नोकरी रा. छत्रपती कॉलनी शिरूर ता. शिरूर जि. पुणे.यांनी अज्ञात चोरट्या विरोधात फिर्याद दिली आहे .
४ मे २०२५ रोजी सायंकाळी सहाचा सुमारास शिरूर येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपणीचे ऑफिस बंद करून मानसिंग नेवसे व इतर सहकारी आप आपल्या घरी निघुन गेले . त्यानंतर दुस-या दिवसी ने सकाळी साडेनऊचा सुमारास ऑफिस ऊघडले त्यावेळी वरिष्ठ अधिकारी वैभव बारवकर सहाय्यक अभियंता यांच्या निदर्शनास आले की
ऑफिसचे बाहेर ठेवलेले ॲल्युनियम कंन्डक्टर व १२० एम. एम केबल ही दिसुन आली नाही ,त्यानंतर ऑफिसचे सी. सी. टी व्ही फुटेच चेक केले असता ऑफिस फुटेचमध्ये ५ मे रोजी अडीच सुमारास गेट मधुन एक अनोळखी इसम मोटार सायकल घेवुन आत मध्ये येताना दिसत असुन
त्याने त्याची मोटार सायकल पार्क करून ॲल्युनियम कंन्डक्टर व १२० एम. एम. चे केबल मोटार सायकलला बांधुन घेवुन जाताना दिसला . २८ हजार रु किमंतीचे ॲल्युनियम कंन्डक्टर व १२ हजार किमंतीची १२० एम एम. केबल असा ४० हजार रु किमंतीचा माल चोरट्यांनी चोरुन नेला
.याबाबत पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार खेडकर करत आहे