Uncategorizedक्राईम

तिहेरी हत्याकांडाने शिरुर हादरले आई सह दोन मुलांचे अर्धवट जळालेले मृतदेह आढळले

शिरूर  दिनांक ( वार्ताहर )  :अहिल्या नगर पुणे महामार्गा लगत रांजणगाव गणपती जवळ ग्रोवेल कंपनीचा लक्ष्मी मंदिराचा लाठीमागे निर्जनस्थळी  खंडाळमाथा परिसरात  रविवारी दुपारी दोनच्या सुमारास  एक महिला आणि तिच्या दोन लहान मुलांचे अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

पोलीस अधीक्षक संदिप गिल यांनी खंडाळा माथा येथे भेट दिली
पोलीस अधीक्षक संदिप गिल यांनी खंडाळा माथा येथे भेट दिली

हे तिहेरी हत्याकांड असल्याचा संशय व्यक्त केला जात असून, संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

महिलेचे वय अंदाजे २० ते २५ वर्ष असून, तिची ओळख अद्याप पटलेली नाही. तिच्यासोबत दोन लहान मुलांचेही मृतदेह आढळले असून, त्यामध्ये एक अंदाजे चार वर्षांचा मुलगा आणि एक दीड वर्षांचा  मुलगा  आहे. तिघांचेही मृतदेह  अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडले आहेत.

या प्रकरणी सहाय्यक फौजदार  गुलाब भिवराज येळे 55 वर्ष सहाय्यक फौजदार रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन यांनी अज्ञात इसमाविरोधात फिर्याद दिली आहे .मृत महिलेचा हाताचे मनगटावर बदाम चिन्ह व त्यापुढे mom Dad इंग्रजीत गोंदलेले असून  पाठीमागील बाजूस बदामामध्ये, ‌R व S व त्यापुढे Rajratan व जय भीम असे गोंदलेल्स असून
डावे हातावर फुलांची डिझाईन आहे .

 पोलीस प्रशासनाला माहिती मिळाल्यावर तत्काळ त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व  पंचनामा करण्याचे काम सुरू केले आहे. पोलिस अधीक्षक संदिप गिल , एसडीपीओ श्री बापूराव दडस दौड उपविभाग, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  अविनाश शिळीमकर, रांजणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक  महादेव वाघमोडे पोलीस स्टेशनचे अधिकारी व स्टाफ तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व स्टाफ यांनी घटनास्थळी भेट दिली. त्याचप्रमाणे गुन्ह्याचे घटनास्थळी फॉरेन्सिक टीम डॉग स्कॉड, फिंगरप्रिंट यांनी भेट दिलेली आहे. मयत महिला व मुलांची ओळख पटवून आरोपी शोध करता वेगवेगळी पथके रवाना करण्यात आली आहेत.ही घटना अत्यंत गंभीर आहे. महिलेची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असल्याने गूढ वाढले आहे.  या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पोलिसांकडून पुढील तपास वेगाने सुरू आहे.

       चौकट

२५ मे  रोजी खंडाळा माथ्याजवळ  एक महिला व तिचे दोन लहान मुलांना कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांचा खून करून त्यांना पेटवून दिलेले आहे सदर महिलेचे वय अंदाजे २५  ते 30 वर्ष लहान मुलाचे वय अंदाजे 4 वर्षे लहान बाळाचे वय अंदाजे दीड वर्षे असे असून सदर महिलेचे उजव्या हातावरती जय भीम हे नाव गोंदलेले आहे व डाव्या हातावरती गोंदलेले आहे. आजूबाजूचे गावातील सर्व नागरिकांना पोलीसांनी  विनंती केले आहे की त्यांच्याकडे असे कोणी भाडेकरू मिसिंग आहे का अगर कोणी पती-पत्नी एवढ्या एक-दोन दिवसांमध्ये रूम सोडून गेले असल्यास त्यांची माहिती पोलीस स्टेशनला कळवावी

पोलीस निरीक्षक वाघमोडे 9420756782

सहाय्यक फौजदार शिंदे 9552537389

पोलीस कॉन्स्टेबल कुतवळ 9689763014

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button