शिरूर दिनांक ( डेली न्यूज पोस्ट टीम -24) गुजर कॉलनी येथे बंद घराचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश चोरट्याने साडेसात ग्रॅमचे ६२ हजार रुपये किमंतीचा सोन्याचे दागिने चोरुन नेले आहेत.
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार माधुरी नारायण तरटे वय 35 वर्ष, धंदा-नोकरी रा. गुजरमळा शिरूर ता. शिरूर जि. पुणे यांनीअज्ञात चोरटा विरोधात फिर्याद दिली आहे .
गुजरमळा येथे माधुरी तरटे यांच्या बंद घराचा कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला व४२ हजार रुपये किमंतीचे दोन जोड ५ ग्रॅम वजनाची सोन्याचे कानातील रिंग ,
२० हजार रु किमंतीची एक सोन्याची अंगठी अडीच ग्रॅम सोन्याची अंगठी असा ६२ हजार रुपये किमंतीचे सोन्याचे दागिने चोरुन नेले आहेत .
याबाबत पोलीस निरीक्षक श्रीशैल्य चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली
सहाय्यक फौजदार कदम करीत आहे .