क्राईम

खताचे उत्पादन व साठा करण्याचा परवाना नसताना उत्पादन व साठा केल्या प्रकरणी गुन्हा दाखल

  • शिरूर ( डेली न्यूज पोस्ट टीम -२४)अमोनियम सल्फेट व मॅग्नेशियम सल्फेट या खताचा उत्पादन घेण्याचा व साठा करण्याचा कोणताही कायदेशीर परवाना नसताना शासनाची फसवणूक करून ८ लाख ७८३०० रुपये किमंतीचे  बेकायदेशीर उत्पादन घेतल्या प्रकरणी दोन जणांचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार  धनंजय दिनकर पाटील वय ५३ वर्षे ,धंदा नोकरी राहणार -सन  ओर बीट सन सिटी रोड सिंहगड रोड पुणे यांनी  संतोष दिनकर वेताळ व महेंद्र गणपत शेलार दोघे हेद  राहणार न्हावरा तालुका शिरूर जिल्हा पुणे यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

  • २७ मे रोजी  सायंकाळी न्हावरा , ता शिरुर येथे  न्हावरा  गुणाट  रोडचे कडेला गट नंबर ३१३ मध्ये संतोष वेताळ व महेंद्र शेलार  त्यांना अमोनियम सल्फेट व मॅग्नेशियम सल्फेट या खताचा उत्पादन घेण्याचा व साठा करण्याचा कोणताही कायदेशीर परवाना नसताना शासनाची फसवणूक करून ८ लाख ७८,३०० रु  किमंतीचे  बेकायदेशीर उत्पादन घेत असताना मिळून आले. याप्रकरणी  पोलीस स्टेशन गु लं 363/2025 भा. न्या. स. कलम 318(4)3(5)रासायनिक खते नियंत्रण आदेश 1985 – 12,21,7,19(c)28,35(1)

  •  अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 -3(2)(d)7,8,10 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण आधिक तपास करीत आहेत .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button