विशेष
शिरुर बसस्थानक आगारातील विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अभिनव आंदोलन

शिरुर (डेली न्यूज पोस्ट टीम -24)शिरुर बसस्थानकातील विविध प्रश्नासंदर्भात लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते प्रितेश फुलडाळे यांनी शिरुर बसस्थानकासमोरील रस्त्यावरील खड्डामध्ये झोपून अभिनव आंदोलन केले .
परंतु एक महिना उलटूनही समस्या जशाच्या तशा असून या विविध विषयावर लक्ष वेधण्यासठी फुलडाळे यांनी आज आंदोलन केले .
बसस्थानकाच्या आवारातील कचराची योग्य विल्हेवाट लावण्याबाबत , नाथजल या पाण्याचा बॉटलचे दर १५ रु असल्याचे फलक बसस्थनाकार लावण्यात येईल .प्रवेशद्वाराच्या गार्डन जवळ लाईट बसविणे. बस आगारातील सीएनजी पंपाचा कामाची माहिती देण्याचे ही आश्वासन देण्यात आले . शिरुर बसस्थानकातून ग्रामीण भागात जाणा-या एस टी बसेस साठी स्वतंत्र फलाट असावा अशी मागणी चर्चे दरम्यान करण्यात आली .