Uncategorizedराष्ट्रीयविशेष
शिरुर येथे एस . टी च्या ७७ व्या वर्धापन दिन उत्सहात . प्रवाश्यांचे गुलाबपुष्प व पेढे देवून स्वागत
शिरुर ( डेली न्यूज पोस्ट टीम -24) :
सनईचे मंगलसूरांनी भारवलेले वातावरण , स्वागतासाठी रांगोळीच्या पायघड्या आणि फुलांनी सजविलेल्या वाहतूक नियंत्रण व चौकशी कक्ष व गुलाबाच्या पाकळ्या उधळत व पेढे देवून करण्यात येणा-या प्रवाश्यांचे
स्वागत अश्या उत्साही वातावरणात शिरुर बसस्थानकात ७७ व्या एस . टीचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला .

महाराष्ट्रात १ जून रोजी पुणे ते अहिल्यानगर दरम्यान पहिली एस . टी . बस धावली .या एस . टीच्या पहिला थांबा शिरुर बसस्थानक होते . असे ऐतिहासिक महत्व असणा -या शिरुर बसस्थानकात एस . टीच्या वर्धापनदिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .

वर्धापन दिनानिमित्त शिरुर ते कुर्ला ( नेहरुनगर ) ला जाणा-या एस . टी बसेसला फुलांनी सजविण्यात आले होते .त्यापुढे आकर्षक अशी रांगोळी घालण्यात आली होती . या बसचे पूजन ज्येष्ठ्य पत्रकार नितीन बारवकर व आगार व्यवस्थपिका मनिषा गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले .
यावेळी शिरुर प्रवाशी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे , महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद , सामाजिक कार्यक्र्ते प्रीतेश फुलडाळे ,, बसस्थानक प्रमुख भैरवनाथ दळवी, सामाजिक कार्यकर्ते महेंद्र बोरा , एस टी कामगार संघटनेचे माधव मुंडे , बापू जगताप कुंदन कांडेकर, समीर झगडे, अमोल साळुंखे , गणपती विभुते, आदी उपस्थित होते .

एस . टी बसचे पूजन झाल्यावर उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत एस . टी . च्या ७७ व्या वर्धापनदिनानिमित्त केक कापण्यात आला . बसस्थानकातील प्रवाश्यांना केक भरविण्यात आला व पेढे वाटून सर्वांचे तोंड गोड करण्यात आले .
आगार प्रमुख मनिषा गायकवाड यांनी यावेळी प्रवाश्यांचे स्वागत करुन एस . टी चा वतीने सुरु असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली .
ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असणारी एस . टी ची सेवा ही टिकणे आवश्यक असून अनेकांचे शिक्षणाचे स्वप्न साकार करण्यात एस . टी चे महत्व अनन्यसाधारण आहे सर्वात सुरक्षित प्रवास हा एस . टी च्या प्रवास असल्याचा अढळ विश्वास प्रवाश्याचा मनात आहे असे मत व्यक्त करुन कोरोना काळानंतर ग्रामीण भागातील कमी झालेल्या एस . टी च्या फे-यांची संख्या वाढवावी अशी अपेक्षा यावेळी प्रा . सतिश धुमाळ व्यक्त केली .
कार्यक्रमचे सूत्रसंचालन माधव मुंडे यांनी तर आभार बसस्थानक प्रमुख भैरवनाथ दळवी यांनी मानले .




