शिरूर दिनांक ( वार्ताहर )सोनेसांगवी मलठण अष्टविनायक रस्त्यावरील कडेच्या लोखंडी चॅनलला मोटारसायकल धडकून झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार सुरेश दादाभाउ बोराडे वय ३९ वर्ष रा. सोनेसांगवी ता. शिरूर जि. पुणे हे मृत्युमुखी पडले .
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार योगेश दादाभाउ बोराडे वय ३६ वर्षे धंदा शेती रा. सोनेसांगवी ता. शिरूर जि. पुणे यांनी फिर्याद दिली आहे.
३१ मे रोजी सुरेश दादाभाऊ बोराडे हे मलठण गावचे हद्दीतील सोनेसांगवी मलठण अष्ठविनायक रस्त्याने हिरो होंडा कंपनीची मोटार सायकल नंबर.एम. एच. 12 ई एस 792 वरून जात असताना सोनेसांगवी मलठण रोडवरती कार्नरला लोखंडी चॅनल ला धडकले.या अपघातामध्ये गंभीर दुखापत होऊन बोराडे मरण पावले.
यासंदर्भात अधिक तपास पोलीस नि्रीक्षक श्रीशैल्य चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस हवालदार वारे करीत आहेत.
यासंदर्भात अधिक तपास पोलीस नि्रीक्षक श्रीशैल्य चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस हवालदार वारे करीत आहेत.

