Uncategorized

आमदाबाद ते मलठण रस्ता व कोंढाण ओढा पुलावरील निकृष्ठ आणि अशास्त्रीय कामांच्या निषेधार्थ बेमुदत “सत्याग्रह आंदोलन”

  • शिरुर ( डेली न्यूज पोस्ट टीम -२४ )राज्य महामार्ग १०३ वरील “आमदाबाद ते मलठण रस्ता व कोंढाण ओढा पुलावरील निकृष्ठ आणि अशास्त्रीय कामांच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते नीलेश वाळूंज यांनी बेमुदत “सत्याग्रह आंदोलन” आज पासून ( दिनांक २ जून ) तहसिल कार्यालयाचा आवारात सुरु केले आहे

    आंदोलनस्थळी जनता दल धर्मनिरपेक्षचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे, आखिल भारतीय मराठा महासंघाचे श्यामकांत वर्पे , योगेश महाजन , अरुणकुमार मोटे , रामदास लाळगे ,मंगेश दंडवते ,विजय शेलार , ॲड के . बी . कुरुंदळे आदीनी भेट दिली.

    यावेळी वाळूंज म्हणाले की “उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करून राज्य मार्ग-१०३ (आमदाबाद ते मलठण) या रस्त्याच्या निकृष्ट कामांची सखोल व निपक्ष चौकशी करावी, सदर रस्त्याची दक्षता गुण नियंत्रण मंडळामार्फत तत्काळ तांत्रिक तपासणी करण्यात यावी.व तपासणी व चौकशी अहवाल सार्वजनिकपणे प्रसिद्ध करून, रस्त्याचे काम नव्याने दर्जेदार पद्धतीने सुरु करावे. गोपनीयतेचा आडोसा न घेता, पूर्वी रामलिंग ते अन्नापूर रस्त्यावर झालेल्या निकृष्ट कामाचा दक्षता गुणनियंत्रण अहवाल जनतेसमोर सादर करावा. या प्रकरणात न्यायालयाने काही कारवाई करू नये असा आदेश केला असल्यास ते आदेश जनतेपुढे ठेवावेत.

    गोपनीयतेचे कारण न देता तत्कालीन मुख्य अभियंता यांनी सदर प्रकरणात दिलेले सर्व पत्रव्यवहार आणि आदेश जनतेसमोर मांडावेत.वरील दोन्ही निकृष्ठ कामांबाबत संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर २०१७ च्या शासन निर्णयानुसार गुन्हे दाखल करावेत.

    जनतेची व तपास अधिकारी यांची दिशाभूल करण्यासाठी निकृष्ठ काम झाकण्यासाठी आमदाबाद फाट्यावर ऐन पावसाळ्यात आंदोलनाच्या आदल्या दिवशी काम सुरू केले असल्याचे समजते परंतु हे काम पुढील कारवाई व इतर चौकशी टाळण्यासाठी सुरू करण्यात आल्याचे आरोप करुन सदर कामांची चौकशी आणि चौकशी झालेले अहवाल तातडीने जनतेसमोर सादर करावेत अशी मागणी वाळूंज यांनी केली .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button