महाराष्ट्रविशेष

शिरुर मधील १०१७ मोकाट व भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण

शिरुर ( डेली न्यूज पोस्ट टीम -२४)  सन -२०२३ पासून शिरुर शहरामधील विविध भागातील सुमारे १०१७ मोकाट व भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांचेवर निर्बिजीकरण शस्त्रक्रिया करून ॲन्टी रेबीज लस देण्याचे काम करण्यात आले असल्याची माहिती मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांनी दिली आहे .
शिरुर शहरामध्ये मोकाट व भटक्या श्वानांचे (कुत्र्यांचे) संख्या गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणात वाढल्याचे व त्यामुळे दिवसाढवळ्या कुत्र्यांनी नागरिकांवर, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांवर हल्ले केल्याने शिरुर शहर व परिसरामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे; अशा प्रकारच्या तक्रारी नगरपरिषदे कडे आल्या होत्या . कुत्र्यांची होणारी पैदास नियंत्रित करणे कामी व कुत्र्यांच्या त्रासा संदर्भात प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने शिरुर नगरपरिषदेने नगरपरिषद हद्दीतील भटक्या व मोकाट श्वानांची (कुत्र्यांची) संख्या नियंत्रित ठेवणे कामी त्यांचेवर निर्बिजीकरण शस्त्रक्रिया करणे व कुत्र्यांना ॲन्टी रेबीज लस देणेचे काम करणेसाठी या कामाच्या निविदा मागवुन या निविदा प्रक्रियेमध्ये मंजुर झालेल्या ॲनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडीया चे मान्यताप्राप्त नोंदणीकृत अभिकर्त्यामार्फत सन २०२३ पासून आज पर्यंत शिरुर शहरामधील विविध भागातील सुमारे १०१७ मोकाट व भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांचेवर निर्बिजीकरण शस्त्रक्रिया करून ॲन्टी रेबीज लस देण्याचे काम केले आहे. विविध भागामधून पकडण्यात आलेल्या श्वानांमध्ये नर आणि मादी यांची मोठी संख्या आहे. सद्यस्थितीमध्ये कुत्र्यांनी नागरिकांवर, लहान मुले व ज्येष्ठ्य नागरिकांवर हल्ले केल्याबाबतच्या तक्रारी नगरपरिषदेस प्राप्त झाल्या असून नगरपरिषदेमार्फत त्यावरही तात्काळ कार्यवाही करण्यात येत असल्याचे पाटील यांनी सांगितल .
तसेच सर्व नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात आले आहे की ऊघड्यावर कचरा टाकू नये , ऊघड्यावर कचरा, शिळे खरकटे अन्न टाकल्याने भटक्या श्वानांना खाद्य मिळते; परिणामी त्यांची संख्या वाढण्यास अप्रत्यक्षरित्या मदत होते. यापुढे भटक्या कुत्र्यांनी नागरिकांना चावा घेण्याचे अथवा त्यांचेवर धावून जाण्याचे प्रसंग उद्भवू नये म्हणून नगरपरिषदे मार्फत शहरातील सर्व भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण व रेबीज प्रतिबंधात्मक लस देण्याचे काम नगरपरिषदेमार्फत चालू असल्याचे पाटील यांनी सांगितले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button