
शिरुर ( डेली न्यूज पोस्ट टीम -२४)
शिरुर बस आगारातील बीओटीच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी आगामी अधिवेशनात करणार असून बारामती सारखे शिरुर बसस्थानक विकसित करण्याचा मानस शिरुरचे आमदार माऊली आबा कटके यांनी व्यक्त केला.
शिरुर बस आगारासाठी नवीन ५ एस टी बसेस उपलब्ध झाल्या असून या नवीन पाच बसेसचे पूजन आमदार माऊली (आबा )कटके यांच्या हस्ते करण्यात आले .
यावेळी बस आगारप्रमुख मनीषा इनामके (गायकवाड ) ,जिल्हा परिषद चे माजी सभापती मंगलदास बांदल, दादासाहेब कोळपे, भाजपाचे तालुकाध्यक्ष राहुल पाचर्णे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवींद्र काळे, बाजार माजी समितीचे सभापती शशिकांत दसगुडे,माजी उपनगराध्यक्ष जाकिरखान पठाण , महेश ढमढेरे, श्रुतिका झाबरे, प्रिया बिरादार,सामाजिक कार्यकर्ते प्रीतेश फुलडाळे , राष्ट्रवादी कॉग्रेसचे शहराध्यक्ष शरद कालेवार , तृप्ती सरोदे, शिवसेनेचे खुशाल गाडे ,भाजपाचे विजय नरके , राजेंद्र महाजन नीलेश नवले , माजी
नगरसेविका माया गायकवाड , सुनील जाधव , अविनाश मल्लाव आदी यावेळी उपस्थित होते.
कटके म्हणाले की जिथे जिथे एस. टी सेवेची आवश्यकता आहे .तिथे एस . टी सेवा उपलब्ध करुन देण्याबरोबरच एस. टी .ला आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करुन देणे व शिरुर आगारासाठी आधिक नवीन एस . टी. बसेस उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. शासनाने विविध बस आगारास नवीन एस . टी . बसेस उपलब्ध करुन देवून विकासाला गती दिली आहे .
शहरासाठी विकास आराखडा तयार करण्यात आला आहे .शिरुर नगरपालिकेस विविध विकासकामांसाठी ३६ कोटी रुपयेचा निधी दिला आहे . जिल्ह्यात आदर्श अशी शिरुरची नगरपालिका विकासकामाच्या माध्यमातून करणार असल्याचे ही ते म्हणाले .
शिरुर बसआगारतील बीओटीच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी आधिवेशनात करणार असल्याचे कटके म्हणाले .
ग्रामीण भागातील कोरोनो काळात बंद झालेल्या एस . टी बसेसच्या फे-या वाढवाव्यात ,बाबूराव नगर भागासह शिरुर पंचक्रोशीत एस टी अथवा पीएमपीएलची बससेवा सुरु करावी , शिरुर बसस्थानकातील चोरीच्या घटना लक्षात घेता येथे पोलीसाची संख्या वाढवावी , शिरुर बस आगारासाठी आणखी नवीन एस टी बसेस द्यावा. अश्या मागण्या यावेळी करण्यात आल्या .
मंगलदास बांदल , शशिकांत दसगुडे , रवींद्र काळे, राहुल पाचर्णे, श्रीनिवास घाडगे, माजी पंचायत समिती सदस्य रामभाऊ कदम, प्रकाश थोरात, समीर झगडे , राजेंद्र कोरेकर , तृप्ती सरोदे ,आदीची मनोगते यावेळी झाली.
यावेळी प्रास्ताविक बस आगार प्रमुख मनिषा इनामके ( गायकवाड ) यांनी केले .
माधव मुंडे यांनी आभार मानले .शिरुर बसस्थानकातील विविध समस्या संदर्भात आंदोलन करणारे प्रीतेश फुलडाळे , राजेंद्र महाजन , प्रिया बिरादार आदींचा सन्मान आमदार कटके यांचा हस्ते करण्यात आला . त्याच बरोबर बसस्थानकात बंदोबस्ता साठी असणा-या गृहरक्षक दलाच्या जवान चंदा चव्हाण यांचा ही विशेष सन्मान आमदार कटके यांच्या हस्ते करण्यात आला .

चौकट
लालपरीचे सारथ्य आमदाराच्या हाती.
शिरुर बस आगारास पाच नवीन बसेस देण्यात आल्या . या बसेसचे पूजन आमदार माउली कटके यांच्या हस्ते झाल्यानंतर माउली कटके यांनी स्वंत एस टी बस मध्ये प्रवेश करुन स्टेअरिंग हातात घेत बसेसचे सारथ्य करत बस चालवली .