विशेष

विद्याधाम प्रशाला, शिरूरच्या २००१ बॅचचा शालेय स्नेहमेळावा – जुन्या आठवणींना नवा उजाळा !

शिरूर( डेली न्यूज पोस्ट टीम -२४)येथील विद्याधाम प्रशालेतून २००१ साली दहावीचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा शालेय स्नेहमेळावा नुकताच अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला.
सुमारे दोन दशकांनंतर, शाळेच्या परिसरात पुन्हा पाऊल ठेवताना सर्वांच्या डोळ्यांत जुन्या आठवणींनी आनंदाश्रू आणले आणि हृदय भरून आले. हा कार्यक्रम म्हणजे एका सुंदर पर्वाचा स्मरणोत्सव होता, ज्यात विद्यार्थी, शिक्षक, आणि शाळेतील इतर कर्मचारी पुन्हा एकत्र आले.गप्पा-गोष्टी, जुन्या आठवणी, यशोगाथा व छायाचित्रांमुळे वातावरण भरून आलं होतं. विविध क्षेत्रात कार्यरत माजी विद्यार्थ्यांनी सामाजिक उपक्रमांची दिशा ठरवण्याचा मनोदय व्यक्त केला.. जुन्या आठवणींचे समृद्ध आदानप्रदान झाले. हा मेळावा केवळ आठवणींमध्ये रमण्यापुरता मर्यादित न राहता, जुनी नाती घट्ट करण्याचा आणि भविष्यात एकत्र काही करण्याचा सकारात्मक प्रयत्न ठरला. सोशल मीडियाच्या मदतीने दूरवर असलेल्या सहपाठींनाही एकत्र आणण्यात यश मिळाले.
या मेळाव्याचे आयोजन कोअर कमिटीने अत्यंत परिश्रमाने आणि नेटकेपणाने केले होते. शाळेतील काही माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन नियोजन, संपर्क, निमंत्रणे, आणि संपूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली. कोअर कमिटी सदस्य – परेश बोथरा, निलेश गवळी, राहुल गावडे, आणि श्रीकांत गिरमकर आशिष वळसंगे यासोबत, आयोजनामध्ये मयूर मास्तोळी ,इम्रान खान, जागृती पुणेकर, पूनम गायकवाड, वृषाली जाधव आणि जयमाला गायकवाड, आदींनी सहकार्य केले. सर्व मित्रांनी त्यांच्या वेळेची, मेहनतीची आणि योग्य समन्वयाची मदत केली व सर्व कार्यक्रम सुरळीत पार पाडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहिणी तोडकर, प्रिती क्षीरसागर, प्रा. किरण बडवे व अर्चना लुणावत-छाजेड यांनी केले. संपदा कुलकर्णी ही ने आभार मांडले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button