अपघात

अज्ञात वाहनाचा धडकेत एक जण मृत्युमुखी

 

शिरुर ( डेली न्यूज पोस्ट टीम -2)अज्ञात वाहने दिलेल्या धडकेत एक जण मृत्युमुखी पडला.अविनाश विठठल म्हस्के वय ३२ वर्षे रा. खांबाळा ता. मानुरा जि. वाशीम असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे .
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सागर नानासाहेब गदादे वय ३४ वर्ष धंदा शेती तादंळी , ता . शिरुर , जि- पुणे यांनी अज्ञात चालक विरोधात फिर्याद दिली आहे .
तांदळी ,ता . शिरूर येथे घोडनदीचे पुलावर काष्टी ते न्हावरा रोडवर एका अज्ञात वाहनावरील अज्ञात चालकाने त्याचे ताब्यातील वाहन हे भरधाव वेगात, हयगईने, अविचाराने, रस्त्याचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालवुन समोरून मोटारसायकल नं. एम.एच.४२.ई. ४१०९ वरुन चालेले अविनाश विठठल म्हस्के यांच्या मोटारसायकलीस पाठीमागुन धडक दिली . त्या धडकेत गदादे यांच्या गडी अविनाश विठठल म्हस्के वय ३२ वर्षे रा. खांबाळा ता. मानुरा जि. वाशीम यास गंभीर दुखापती होवुन मृत्युमुखी पडला .
अपघाताचा आधिक तपास
पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कदम करीत आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button