शिरूर (डेली न्यूज पोस्ट टीम -24)
पुणे अहिल्यानगर महामार्गावरील
हॉटेल कल्याणी व सदगुरु हॉटेलमध्ये नेहमीच्या ग्राहकांपैकी असलेले समीर शेख हे पुण्याला जात असताना
दुपारी नाश्ता करून पुढील प्रवाशास निघाले. परंतु त्यांची मोठ्या प्रमाणात रोख रक्कम असलेली बॅग टेबलवर विसरून राहिली होती.
ही बॅग हॉटेलमधील प्रामाणिक वेटर सत्यपाल परमार यांच्या लक्षात आली. त्यांनी तात्काळ ती बॅग हॉटेलच्या काउंटरवर कार्यरत रेखा सचिन पवार यांच्याकडे सुपूर्द केली.
अर्ध्या तासाने समीर शेख यांना आपली बॅग हॉटेलमध्ये राहिल्याची जाणीव झाली. त्यांनी हॉटेलचा मोबाईल नंबर वर संपर्क साधला. “तुमची बॅग सुरक्षित आहे, काळजी करू नका,” असे आश्वासन त्यांना सांगण्यात आले.
बॅगेत मोठ्या स्वरूपात रोख रक्कम असल्यामुळे बॅग सुरक्षित असल्याचे समजताच समीर शेख यांना आनंद झाला. त्यांनी हॉटेलवर येऊन आपली बॅग स्वीकारली आणि वेटरला बक्षीस देऊन रेखा सचिन पवार यांचे मनापासून आभार मानले.
तुमच्यासारखे प्रामाणिक लोक फार कमी आहेत व आपल्या प्रामाणिक पणाचा अभिमान वाटतो अशा शब्दांत शेख यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या .